News Flash

डोळ्यात मिरची पावडर टाकून १५ लाखांची रोकड लुटली

एका बॅकेतून दुसऱ्या बॅकेत पैस पाठविण्याच्या प्रकियेवर भीतीचे सावट

संग्रहित

बीड जिल्ह्यामध्ये उमापूर-गेवराई  रस्त्यावर स्टेट बॅंक ऑफ हैदराबाद शाखेत पैसे घेऊन जाणारी बॅंकेची गाडी लूटल्याची घटना गुरुवारी सकाळी घडली. बीडमधील गेवराईतील स्टेट बॅंक ऑफ हैदराबादच्या शाखेतून धोडराई शाखेत पैसे पाठविले जातात. नेहमीप्रमाणे स्टेट बॅंक ऑफ हैदराबादचे कर्मचारी गेवराईच्या शाखेतून धोडराई शाखेकडे बॅंकेच्या गाडीतून पैसे घेऊन जात होते. यावेळी अज्ञात व्यक्तींनी ही गाडी उमापूर-गवोरे रस्त्यावर अडवली. तसेच गाडीतील मॅनेजर व कर्मचाऱ्यांच्या डोळ्यात मिरची पावडर टाकून गाडीतील १५ लाखांची रक्कम लंपास केल्याची तक्रार बॅंक कर्मचाऱ्यांनी पोलीस ठाण्यात दाखल केली आहे. यासंदर्भात बीड पोलीस अधिक तपास करत आहेत. बीड जिल्ह्यात स्टेट बॅंक ऑफ हैदराबादच्या एकूण १९ शाखा आहेत. या प्रकारामुळे एका बॅकेतून दुसऱ्या बॅकेत पैस पाठविण्याच्या प्रकियेवर भीतीचे सावट आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 14, 2016 5:56 pm

Web Title: state bank of hydrad bank cash van robbery
Next Stories
1 ISIS : ‘आयसिस’च्या संपर्कात असलेल्या तरुणाला परभणीतून अटक
2 बलात्काराविषयीच्या विधानावर सलमानचे महिला आयोगाला स्पष्टीकरण, माफी मागण्यास दिला नकार
3 पालख्या आज पंढरीत
Just Now!
X