09 August 2020

News Flash

सांगलीजवळ कवडा पाचू जखमी अवस्थेत आढळला

राज्य पक्षी म्हणून दर्जा मिळालेला कवडा पाचू जखमी अवस्थेत सांगलीजवळ हरिपूर येथे सापडला.

राज्य पक्षी म्हणून दर्जा मिळालेला कवडा पाचू जखमी अवस्थेत सांगलीजवळ हरिपूर येथे सापडला. विजेच्या तारामुळे जखमी झालेल्या हिरव्या रंगाच्या कवडा पाचूवर आठ दिवसांच्या उपचारानंतर त्याला निसर्गात मुक्त करण्यात आले.

अत्यंत लाजाळू म्हणून ओळखल्या जाणाऱ्या कबुतराच्या जातकुळातील असलेल्या कवडा पाचूचे शास्त्रीय नाव ‘ग्रीन पीझन’ असून त्याला काही भागात हरियल असेही म्हटले जाते. ग्रामीण भागात याला हिरवे कबुतर असेही म्हटले जाते. त्याचे अस्तित्व अत्यंत दुर्मीळ झाले असून यामुळेच त्याला राज्य पक्ष्याचा दर्जा देण्यात आला आहे. उंबर आणि पिंपळ या झाडावरील लाल फळे हे त्याचे मुख्य खाद्य असून ही झाडे शहरातून हद्दपार झाल्याने या पक्षाचे अस्तित्व दुर्मीळ झाले आहे.

हरिपूर येथील माजी नगरसेवक बाळू गोंधळे यांना हा पक्षी घराशेजारी पडल्याचे आढळून आले. त्यांनी इन्साफ फौंडेशनचे मुस्तफा मुजावर यांना याची माहिती दिली. पंखाखाली मांसल भागात जखम झाल्याने त्याला उडता येत नव्हते. मुजावर यांनी घरी आणून त्याच्यावर वैद्यकीय उपचार केल्यानंतर आठ दिवसांनी तो पूर्ण ठीक झाल्यानंतर गुरुवारी त्याची नसíगक अधिवासात रवानगी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 6, 2019 2:27 am

Web Title: state bird green pizan injured akp 94
Next Stories
1 महिला अधिकाऱ्यांवर राज्यातील कुपोषण निवारणाची जबाबदारी
2 पीक पद्धतीत बदल करून उत्पन्न दुप्पट करण्यावर भर
3 बंदुकीची गोळी लागल्याने शिकाऱ्याचाच मृत्यू
Just Now!
X