26 October 2020

News Flash

मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना दिलासा! ठाकरे सरकारने घेतले ‘हे’ निर्णय

मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर घेण्यात आले महत्त्वाचे निर्णय

(संग्रहित छायाचित्र)

मराठा समाजातील विद्यार्थी आणि युवकांना ठाकरे सरकारने दिलासा देण्यासाठी महत्त्वाचे निर्णय घेतले आहेत. मराठा बांधवांना आम्ही काहीही कमी पडू देणार नाही. त्यांच्या न्याय आणि हक्कांसाठी जे योग्य असेल असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी स्पष्ट केलं आहे. दरम्यान आज मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. या बैठकीत मराठा समाजातील विद्यार्थ्यांना आणि युवकांना दिलासा देण्यासाठी सखोल चर्चा झाली. त्यानंतर मराठा समाजातील बांधवांसाठी काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत.

मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेले महत्त्वाचे निर्णय

  • मराठा मोर्चा काढण्यात आला होता त्यावेळी गंभीर स्वरुपाचे गुन्हे सोडून इतर सर्व गुन्हे मागे
  • आर्थिक दृष्ट्या दुर्बल असलेल्या लाभ एसईबीसी प्रवर्गातील उमेदवारांना देण्यात येणार
  • राजर्षी छत्रपती शाहू महाराज शिक्षण शिष्यवृत्ती योजना पूर्वी एसईबीसी विद्यार्थ्यांसाठी लागू करण्यात आली होती ती तशीच आता इडब्लूएस मध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. राज्य शासनाने या वित्तीय वर्षासाठी ६०० कोटींचा निधी मंजूर जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
  • डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह भत्ता योजना पूर्वी एसईबीसी प्रवर्गासाठी लागू होती. ती तशीच आता इडब्लूएसमध्ये आलेल्या विद्यार्थ्यांकरिता लागू करण्यात येईल. त्यासाठी ८० कोटी इतकी तरतूद मंजूर करण्यात आलेली आहे. यासाठी पूर्ण निधी उपलब्ध करुन देण्यात आला आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
  • उच्च व तंत्रशिक्षण विभागामार्फत डॉ.पंजाबराव देशमुख वसतिगृह निर्वाह योजनेंतर्गत शासकीय व इतर इमारती आर्थिकदृष्टया दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांकरीता वसतिगृह चालविण्यासाठी नोंदणीकृत संस्थांना देण्याची योजना राबविण्यात येते. ही योजना अधिक गतीमान करण्यात येईल.
  • छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे यांना भरीव निधी व मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात येईल. सारथी संस्थेने या वर्षासाठी रु.१३० कोटीची मागणी केलेली आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
  • अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळातर्फे बेरोजगार तरुणांना व्यवसायिकांसाठी आर्थिक मदत देण्यात येत आहे. यासाठी भागभांडवल ४०० कोटीने वाढविण्यात आले आहे. जादा निधीची आवश्यकता भासल्यास त्याची तरतूद करण्यात येईल.
  • मराठा क्रांती मोर्चामध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांच्या वारसांना महाराष्ट्र राज्य मार्ग परीवहन महामंडळात नोकरीत घेण्याबाबत शासनाने निर्णय घेतलेला आहे त्याप्रमाणे कार्यवाही करण्यात येत आहे. प्रस्ताव जसे प्राप्त होतील, त्यापासून एका महिन्यात कार्यवाही करण्यात येईल.

तर हे महत्त्वाचे निर्णय आज झालेल्या बैठकीनंतर घेण्यात आले आहेत. या मराठा समाजाला दिलासा देण्यासाठी ठाकरे सरकार पावलं उचलताना दिसतं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 22, 2020 11:31 pm

Web Title: state cabinet took important decision for maratha community in todays meeting scj 81
Next Stories
1 पालघर शहरात टँकरखाली चिरडून एकाचा मृत्यू
2 महाराष्ट्रात १८ हजारांपेक्षा जास्त नवे करोना रुग्ण, ३९२ मृत्यू
3 मराठा आरक्षण आंदोलन : गंभीर स्वरुप नसलेले सर्व खटले मागे घेण्याचा निर्णय
Just Now!
X