देशातील करोनारुपी संकट कमी होण्याचं नाव घेत नाही. करोनाची दुसरी लाट ओसरत असताना आता तिसऱ्या लाटेचा इशारा देण्यात आला आहे. गेल्या काही दिवसात करोना रुग्ण संख्येत किंचित वाढ झाल्याचंही पाहायला मिळत आहे. यासाठी राज्य सरकार सावध पावलं उचलताना दिसत आहे. राज्यात करोना लसीकरण मोहीम वेगाने राबविण्यात येत आहे. शहरी भागासोबत ग्रामीण भागातही लसीकरणाचा वेग वाढवण्यात आला आहे. येत्या दोन दिवसात गणेशोत्सव सुरु होणार आहे. मात्र करोनाचं संकट पाहता निर्बंधात कोणतीही सूट देण्यात आलेली नाही. त्याचबरोबर राज्यातील मंदिर उघडण्याचा निर्णयही लांबणीवर गेल्याचं दिसत आहे.

आज राज्यात ४ हजार १७४ नव्या करोना रुग्णांची नोंद झाली आहे. गेल्या काही दिवसात करोना रुग्णांचा आकडा ४ हजारांच्या आसपास असल्याचं दिसत आहे. दुसरीकडे गेल्या २४ तासात ४ हजार १५५ रुग्णांनी करोनावर मात केल्याने त्यांना घरी सोडण्यात आलं आहे. राज्यात आतापर्यंत एकूण ६३ लाख ८ हजार ४९१ जणांनी करोनावर मात केली आहे. राज्यात रुग्ण बरे होण्याचं प्रमाण हे ९७.०९ टक्के इतकं आहे. राज्यात सध्या ४७ हजार ८८० रुग्ण सक्रिय आहेत. राज्यात आज ६५ करोनाबाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे .सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के इतका आहे.

पिण्याचे पाणी हा मूलभूत अधिकार; स्वातंत्र्याच्या ७५ वर्षांनी पाण्यासाठी कोर्टात यावं लागणं दुर्दैवी: मुंबई हायकोर्ट

राज्यात आजपर्यंत तपासण्यात आलेल्या ५,५३,३८,७७२ प्रयोगशाळा नमुन्यांपैकी ६४,९७,८७२ (११.७४ टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात ३,०७,९१३ व्यक्ती होम क्वारांटाईनमध्ये आहेत. तर १,९३७ व्यक्ती सांस्थातमक क्वारांटाईनमध्ये आहेत.