स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचा खर्चाचा तपशील सादर न केल्याप्रकरणी राज्य निवडणूक आयोगाने १४ राजकीय पक्षांना नोटीस बजावली आहे. १० मार्च २०१९ पर्यंत खर्चाचा तपशील या सगळ्या पक्षांनी सादर करावा असेही सांगण्यात आल्याचे राज्य निवडणूक आयुक्त जे. एस. सहरिया यांनी सांगितले. सहरिया यांनी सांगितले की राज्य निवडणूक आयोगाच्या १५ ऑक्टोबर २०१६ च्या आदेशान्वये राजकीय पक्षांना निवडणूक खर्च सादर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. यासंदर्भात वेगवेगळ्या माध्यमातून राजकीय पक्षांना वेळोवेळी अवगतही करण्यात आले होते. मात्र तरीही हा तपशील न सादर झाल्याने आता नोटीस बजावण्यात आली आहे.
भारतीय जनता पार्टी, शिवसेना, भारतीय कम्युनिस्ट पक्ष, भारताचा कम्युनिस्ट पक्ष (मार्क्सवादी), बहुजन समाज पार्टी, भारतीय राष्ट्रीय काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जनता दल (सेक्युलर), समाजवादी पार्टी, ऑल इंडिया अण्णा द्रविड मुन्नेम कझगम, लोकजनशक्ती पार्टी, ऑल इंडिया मजलिस इत्तेहदूल मुस्लिमीन आणि जनता दल युनायटेड या सगळ्या पक्षांना निवडणूक आयोगाने नोटीस बजावली आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on March 7, 2019 8:33 pm