News Flash

राज्य प्रशासनात फेरबदल; १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या!

राज्यातील १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या करण्याचे आदेश शुक्रवारी संध्याकाळी राज्य सरकारने काढले आहेत.

mantralay building
मंत्रालय इमारत (संग्रहीत छायाचित्र)

एकीकडे राज्यात करोनापाठोपाठ अतिवृष्टी, पूरस्थिती अशी अनेक संकटं उभी असताना स्थानिक पातळीवर कार्यक्षम प्रशासकीय अधिकारी असणं ही नितांत गरजेची बाब आहे. या पार्श्वभूमीवर राज्यात सातत्याने प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या होत असताना दिसून येत आहे. नुकतीच राज्य सरकारने राज्यातल्या तब्बल १४ सनदी अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. त्यामुळे प्रशासकीय व्यवस्थेमध्ये फेरबदल झाल्याचं दिसून येत आहे. राज्य सरकारने शुक्रवारी संध्याकाळी

कोणत्या अधिकाऱ्यांच्या झाल्या बदल्या?

१. संजय दैने, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, गोंदिया यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, मालेगाव महानगरपालिका पदावर करण्यात आली आहे.
२. अनिल पाटील, व्यवस्थापकीय संचालक, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ, मुंबई यांची नियुक्ती सचिव, प्रदेश नियंत्रण प्राधिकरण, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
३. मलीकनेर, सहमुख्य कार्यकारी अधिकारी, एमआयडीसी, मुंबई यांची नियुक्ती आहे त्याच पदी पुन्हा करण्यात आली आहे.
४. सुरेश जाधव यांची नियुक्ती आयुक्त, कामगार महाराष्ट्र राज्य, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
५. प्रताप जाधव, उपायुक्त, पुणे महसूल विभाग, पुणे यांची नियुक्ती उप महासंचालक, यशदा, पुणे या पदावर करण्यात आली आहे.
६. कुमार खैरे यांची नियुक्ती सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य चित्रपट, रंगभूमी व सांस्कृतिक विकास मंडळ या पदावर करण्यात आली आहे.
७. जी एम बोडके सह व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी, कल्याण यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, अकोला महानगरपालिका या पदावर करण्यात आली आहे.
८. एस जी देशमुख, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, ठाणे यांचे नियुक्ती अतिरिक्त मुद्रांक नियंत्रक, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.
९. एम देवेंद्र सिंह यांची नियुक्ती संचालक, महाराष्ट्र शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे या पदावर करण्यात आली आहे.
१०. राहुल कर्डिले, यांची सह महानगर आयुक्त, मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण या पदावर नियुक्ती करण्यात आली आहे.
११. जी एस पापळकर यांची नियुक्ती जिल्हाधिकारी, हिंगोली या पदावर करण्यात आली आहे.
१२. रुचेश जयवंशी जिल्हाधिकारी, हिंगोली यांची नियुक्ती व्यवस्थापकीय संचालक, महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ, अकोला या पदावर करण्यात आली आहे.
१३. एन आर गटणे, अध्यक्ष, जिल्हा जाती प्रमाणपत्र पडताळणी समिती, पालघर यांची नियुक्ती महापालिका आयुक्त, नांदेड वाघाळा शहर महानगरपालिका नांदेड या पदावर करण्यात आली आहे.
१४. दीपेंद्रसिंह कुशवाह, आयुक्त, कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, नवी मुंबई यांची नियुक्ती सहसचिव (उद्योग), उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग, मंत्रालय, मुंबई या पदावर करण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 30, 2021 6:55 pm

Web Title: state government transfer order for 14 government officials in maharashtra pmw 88
टॅग : Ias,Transfer
Next Stories
1 अनिल देशमुख आणि ऋषिकेश देशमुख यांना ED चे समन्स
2 मास्टरशेफ संजीव कपूर यांचा पूरग्रस्तांना मदतीचा हात; चिपळूण आणि महाडमध्ये दररोज १५,००० थाळ्या पुरविणार
3 साताऱ्यात ११ तलवारींसह हत्यारं जप्त; विशेष शाखेची कारवाई
Just Now!
X