घरी राहा नाहीतर विकेट पडेल अशा आशयाचं एक पोस्टर कल्याण डोंबिवली महापालिकेने स्टेशनजवळ लावलं आहे. या पोस्टरमध्ये करोनाबाबत जनजागृती करण्यात आली आहे.

काय म्हटलं आहे पोस्टरमध्ये ?

या पोस्टरमध्ये घरी राहा, सुरक्षित राहा असा संदेश देण्यात आला आहे. तसंच या पोस्टरमध्ये एक पोलीस करोना व्हायरसला काठीने टोलवतो आहे असं दाखवण्यात आलं आहे. पोलिसाच्या चेहऱ्यावर मास्क आहे. नागरिकांना स्टंपच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. करोना व्हायरसला चेंडूच्या रुपात दाखवण्यात आलं आहे. घरी राहा नाहीतर विकेट पडेल असा संदेशही देण्यात आला आहे.

करोना व्हायरस तुमची विकेट घेऊ पाहतो आहे त्यामुळे घरी राहा आणि सुरक्षित राहा असा संदेश या पोस्टरमध्ये देण्यात आला आहे. तसंच पोलीस हे नागरिक आणि करोना व्हायरस यांच्यामध्ये एखाद्या बॅट्समन प्रमाणे उभे आहेत आणि त्याचा मुकाबला करुन त्या व्हायरसला पळवून लावत आहेत असंही दाखवण्यात आलं आहे. हे पोस्टर डोंबिवलीत चर्चेचा विषय ठरलं आहे. कल्याण डोंबिवली १२० वर करोना रुग्ण आहेत. घऱी राहा, लॉकडाउनचे नियम पाळा आणि सुरक्षित राहा असा संदेश या पोस्टरमधून देण्यात आला आहे.