28 February 2021

News Flash

मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे; चंद्रकांत पाटलांचं विठ्ठलाला साकडं

विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करेल, वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी शासन निधी देईल.

पंढरपूर : कार्तिकी एकादशीनिमित्त विठ्ठलाची महापूजा करताना महसुलमंत्री चंद्रकांत पाटील सपत्नीक, मानाचे वारकरी दाम्पत्य, मंदिर समितीचे अध्यक्ष डॉ. अतुल भोसले व आदी. (छायाचित्र : मंदार लोहोकरे, पंढरपूर)

मंदार लोहोकरे

राज्याला दुष्काळातून बाहेर काढण्यासाठी आम्हाला बळ दे तसेच मराठा आरक्षण कोर्टात टिकू दे, असे साकडे महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी विठ्ठलाकडे घातले आहे. कार्तिकीवारीनिमित्त शासकीय महापुजेला पाटील यांनी सपत्नीक हजेरी लावली. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना त्यांनी विठ्ठलाजवळ आपण व्यक्त केलेल्या भावना सांगितल्या.

पाटील म्हणाले, राज्याला दुष्काळातून बाहेर पाडण्यासाठी बा विठ्ठला आम्हाला बळ दे असे साकडे आपण विठ्ठल रुक्मिणी मातेला घातले आहे. तसेच मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठीची आवश्यक कायदेशीर कार्यवाही लवकरच पूर्ण केली जाईल. हे आरक्षण न्यायालयात टिकू दे अशी प्रार्थनाही आपण विठ्ठलाकडे केली आहे. विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीच्या सर्व मागण्यांवर शासन सकारात्मक विचार करेल, वारकऱ्यांना सुविधा देण्यासाठी शासन निधी देईल, असेही ते यावेळी म्हणाले.

या महापुजेला कोल्हापूर जिल्ह्यातील मळगे (बु) येथील बाळासाहेब हरिभाऊ मेंगाणे आणि आनंदी बाळासाहेब मेंगाणे या दर्शन रांगेतील पहिल्या वारकरी दाप्म्त्याला शासकीय महापुजेचा मान देण्यात आला. दरम्यान, एकादशी सोहळ्यासाठी लाखो वैष्णवासह वरुणराजाने देखील हजेरी लावली. सोमवारी पहाते पडलेल्या पावसाने वारकऱ्यांची तारांबळ उडाली. कार्तिकी यात्रेनिमित्त विठ्ठल रुक्मिणीमातेच्या दर्शनासाठी लाखो भाविक पंढरीत दाखल झाले आहेत.

एकादशीला श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीचे सहअध्यक्ष हभप गहिनीनाथ महाराज औसेकर यांच्या हस्ते पहाटे नित्यपूजा झाली. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी सपत्नीक विठ्ठलाची महापुजा केली. यावेळी विठ्ठल-रुक्मिणी मंदिर समितीचे अध्यक्ष अतुल भोसले, जिल्हाधिकारी राजेंद्र भोसले, माजी मंत्री बबनराव पाचपुते, मंदिर समितीचे सहअध्यक्ष गहिनीनाथ महाराज औसेकर आदी उपस्थित होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 19, 2018 9:40 am

Web Title: stay maratha reservation in the court chandrakant patils prayer to vitthala
Next Stories
1 राज्यातील अनेक भागात जोरदार पावसाची हजेरी
2 पटेलांचा पुतळा उंच ठरावा म्हणून शिवरायांच्या पुतळ्याची उंची छाटणे हे विकृत मनाचे लक्षण – उद्धव ठाकरे
3 महाराष्ट्राचा केंद्रात सन्मान !
Just Now!
X