05 July 2020

News Flash

मोहोळजवळ भरदिवसा चोरटय़ांनी हल्ला करून पावणेचार लाख लुटले

मित्राच्या आजारी आईला भेटण्यासाठी आलेल्या एका महिलेसह चौघा जणांना चोरटय़ांनी दिवसाढवळ्या शस्त्रांनी हल्ला करून तीन लाख ७५ हजारांस लुटल्याची घटना मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे घडली.

| May 10, 2014 02:32 am

मित्राच्या आजारी आईला भेटण्यासाठी आलेल्या एका महिलेसह चौघा जणांना चोरटय़ांनी दिवसाढवळ्या शस्त्रांनी हल्ला करून तीन लाख ७५ हजारांस लुटल्याची घटना मोहोळ तालुक्यातील नरखेड येथे घडली. मोहोळ पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली आहे.
मीरा व्यंकटेश प्रभू (रा. लक्ष्मीनगर, पुणे) या आपल्या सहकारी गोविंद पाटील यांच्यासह चौघा जणांसोबत कर्नाटकातील सेडम येथे खासगी मोटारीने निघाल्या होत्या. प्रवासात सोबत असलेले आमरे यांच्या मित्राची आई आजारी असल्याने सर्व जण मोहोळजवळ नरखेडकडे निघाले होते. नरखेडकडे जाताना वाटेत मोटार थांबली असता आठ ते दहा अज्ञात चोरटय़ांनी हातात काठय़ा व गज घेऊन मीरा प्रभू व इतरांवर हल्ला केला. त्यानंतर चोरटय़ांनी दहशत निर्माण करून मीरा प्रभू यांच्याजवळील सोन्याच्या बांगडय़ा, कर्णफुले, रोख रक्कम असा सुमारे तीन लाख ७५ हजारांचा ऐवज बळजबरीने लुटून नेला. भर दुपारी अडीचच्या सुमारास घडलेल्या या गुन्ह्य़ाचा तपास मोहोळ पोलीस ठाण्यातील सहायक पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे हे करीत आहेत.
बार्शीत अडीच लाख लुटले
बार्शी एसटी बस स्थानकात उस्मानाबादकडे जाणाऱ्या एसटी बसमध्ये चढताना अलीम शेख (रा. उस्मानाबाद) या प्रवाशाची पिशवी चोरटय़ांनी ब्लेडने कापून त्यातील अडीच लाखांची रोकड लांबविली. शेख हे जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक असून त्यांनी उस्मानाबाद येथे स्वत:च्या घर बांधकामासाठी सोलापूर जिल्हा प्राथमिक शिक्षक सहकारी पतसंस्थेच्या बार्शी शाखेतून कर्ज काढले होते. कर्जाची रक्कम घेऊन शेख हे उस्मानाबादकडे निघाले असता एसटी बसमध्ये चढताना चोरटय़ांनी गर्दीचा फायदा घेऊन त्यांची रक्कम लंपास केली. बार्शी पोलीस ठाण्यात या गुन्ह्य़ाची नोंद झाली असून सहायक पोलीस निरीक्षक अभिषेक डाके हे गुन्ह्य़ाचा तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 10, 2014 2:32 am

Web Title: stolen 3 lakh 75 thousand in mohol
टॅग Solapur,Stolen,Theft
Next Stories
1 ‘काळीपिवळी’धारकांचे शासकीय जागेत ठाण!
2 कल्पना गिरी हत्याप्रकरणाचा तपास सीआयडीकडे
3 वयोवृध्दांना फसविणा-यास कोल्हापुरात अटक
Just Now!
X