शहरातील जुनी गल्ली भागातील दोन गटात गुरूवारी रात्रीच्या सुमारास अचानक वाद झाला़. या वादाचे रूपांतर दगडफेकीत झाले. या घटनेमुळे परिसरात मोठा तणाव निर्माण झाला होता़. काही वाहनांचे नुकसानसुद्धा झाले आहे़.

शहरातील जुनी गल्ली भागातील प्रमुख चौकात गुरूवारी रात्रीच्या सुमारास अचानक दोन गटात झेंड्याच्या कारणावरून वाद उफाळून आला़. नंतर या वादाचे रूपांतर दगडफेक झाल्याने तणावाचे वातावरण निर्माण झाले होते़. रस्त्यातील पानटपरीचे नुकसान करण्यात आले आहे़ तर दगडफेकीत दोन ते तीन वाहनांचे नुकसान झाले आहे़. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी मोठ्या फौजफाट्यासह घटनास्थळी धाव घेतली़. सध्या पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली असली, तरी  तणावाचे वातावरण कायम आहे.