News Flash

नवीन पनवेलमध्ये चर्चवर दगडफेक

नवीन पनवेल वसाहत आणि पनवेल शहराला जोडणाऱ्या उड्डाण पुलाजवळील सेंट जॉर्ज चर्चवर शुक्रवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दगडफेक करून चर्चच्या तळमजल्याच्या खिडक्यांच्या काचा

| March 22, 2015 11:35 am

नवीन पनवेल वसाहत आणि पनवेल शहराला जोडणाऱ्या उड्डाण पुलाजवळील सेंट जॉर्ज चर्चवर शुक्रवारी मध्यरात्री दुचाकीवरून आलेल्या तिघांनी दगडफेक करून चर्चच्या तळमजल्याच्या खिडक्यांच्या काचा फोडल्या. यानंतर हे हल्लेखोर पसार झाले. रात्री दीड वाजता ही घटना घडली, त्यावेळी या चर्चमधील रखवालदार झोपला होता. दगडफेक करणाऱ्या तिघांनीही आपली तोंडे कपडय़ांमध्ये गुंडाळली होती. ते दुचाकीवरून आल्याचे पोलिसांना मिळालेल्या सीसीटीव्ही चित्रणात दिसत आहे. याबाबत खांदेश्वर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 22, 2015 11:35 am

Web Title: stones hurled at church in new panvel
Next Stories
1 कुलगुरुपदाच्या मुलाखती वर्ध्यातच
2 राज्यातील गारपीटग्रस्तांना १ एप्रिलपासून मदत
3 पाडव्याला तमाशा पंढरीत अडीच कोटींची उलाढाल
Just Now!
X