समाजातील बहिष्कृत घटकांना बदलविण्याच्या जिद्दीने अखंड कार्य करणाऱ्यांच्या यादीत नागपूरच्या विमलाश्रमाचे संस्थापक राम इंगोले यांना अगदी अलीकडच्या काळात समाजमान्यता मिळाली.. सलग तीन दशकांपासून वेश्यांच्या मुला-मुलींना चांगल्या वातावरणात वाढवून त्यांचे आयुष्य बदलून टाकण्याची किमया राम इंगोलेंनी एकहाती घडविली आहे.
कधीकाळी नागपूरच्या मानेवाडा भागात भाडय़ाची घरे बदलवत कुणालाही पत्ता लागू न देता राम इंगोलेंनी वेश्यांच्या मुलांचा सांभाळ  सुरू केला. वेश्यांच्या मुलांचा सांभाळ करतो म्हणून समाजाने त्यांना स्वीकारले नाही.. वैयक्तिक आयुष्यातही वावटळ उठली.. सामाजिक बहिष्कारासोबत नातेसंबंधातही कडवटपणा आला. कारण, समाजाला मान्य नसलेली ही महत्त्वाकांक्षा सोपी नव्हती.. समाजकार्यात हातभार लावणाऱ्या पडद्यामागील लोकांच्या मदतीच्या भरवशावर या मुलांचे आयुष्य त्यांनी बदलवून टाकले.. हृदयाला घरे पाडणारे एकापेक्षा एक विदीर्ण अनुभव आल्यानंतरही विमलाश्रमाचे कार्य अखंड सुरू आहे..
..अन् पुणे भारत गायन समाजाचीही
विद्याधर कुलकर्णी, पुणे
सर्वसामान्यांना अभिजात संगीत कळावे, शास्त्रीय संगीताचा प्रचार-प्रसार व्हावा या उद्देशाने स्थापन झालेल्या आणि शताब्दी पार केलेल्या पुणे भारत गायन समाज संस्थेला नव्या काळाशी सुसंगत असे विविध सांगीतिक उपक्रम राबवावयाचे आहेत. गायनाचार्य देवगंधर्व भास्करबुवा बखले यांची पुण्याई आणि विद्यमान संचालकांचे प्रयत्न असले तरी कोणत्याही सरकारी अनुदानाअभावी काम करणाऱ्या संस्थेला आर्थिक चणचण ही जाणवतेच. भास्करबुवांची ही संस्था ‘भास्करा’प्रमाणे तळपावी, अभिजात शास्त्रीय संगीताच्या जतन आणि संवर्धनासाठी खारीचा वाटा उचलण्याचे योगदान समाजाने द्यावे, अशी अपेक्षा आहे. विविध घराण्यांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या बुजुर्ग कलाकारांच्या गायन आणि वादनकलेचे ग्रामोफोनच्या माध्यमातून जतन करण्यात आले आहे.  अशा सुमारे चार हजार ग्रामोफोन रेकॉर्ड्स संस्थेच्या संग्रहामध्ये आहेत. या रेकॉर्ड्स आता सीडी माध्यमामध्ये रूपांतरित करावयाच्या असा आमचा मानस आहे, अशी माहिती संस्थेच्या अध्यक्ष आणि प्रसिद्ध गायिका शैला दातार व माजी अध्यक्ष सुहास दातार यांनी दिली. संस्थेमध्ये झालेल्या वेगवेगळय़ा मैफलींचाही त्यामध्ये अंतर्भाव आहे

PMC pune municipal corporation
रस्त्यावर फेकलेल्या कचऱ्यातून पत्ते शोधून दंडाची वसुली; मोटारीतून कचरा फेकणाऱ्यांचा पाठलाग करून महापालिकेच्या अधिकाऱ्यांकडून कारवाई
शेतकरी आंदोलनाचे नेतृत्व करणाऱ्या नेत्यांंच्या जमिनींचा शोध, सरकारकडून दबाव टाकण्याचा प्रयत्न – जे. पी. गावित यांचा आरोप
nilesh rane paid 25 lakhs to pune municipal corporation to settle the tax dues
पुणे: निलेश राणे यांच्यासाठी महापालिकेच्या पायघड्या; अवघे २५ लाख भरल्यानंतर मिळकतकराची थकबाकी शून्य
Social workers detained yavatmal
आंदोलनाची दहशत… मोदींच्या सभेपूर्वीच सामाजिक कार्यकर्ते स्थानबद्ध