शिवसेना मजबूत करून पक्षवाढीसाठी कसोशीने प्रयत्नशील राहणार असून, सामान्य शिवसैनिकालाही सत्तेचा लाभ कसा मिळेल यासाठी कटिबद्ध असल्याची ग्वाही शिवसेनेचे नवनिर्वाचित मंत्री शंभूराज देसाई यांनी सातारा येथे शिवसेना पदाधिकाऱ्यांच्या बैठकीत बोलताना दिली. शिवसेना आमदार महेश शिंदे यांच्यासह जिल्ह्यतील प्रमुख शिवसैनिकांची या वेळी उपस्थिती होती.

मंत्री देसाई म्हणाले, की शिवसेना पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी माझ्यावर राज्याचा राज्यमंत्री म्हणून तसेच, जिल्हय़ात व राज्यात पक्षसंघटना मजबूत करण्याचीही जबाबदारी दिली आहे.

Eknath Shinde, Eknath Shinde kolhapur,
कडक उन्हात मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत कोल्हापुरात मंडलिक, माने यांचा उमेदवारी अर्ज दाखल; जोरदार शक्तिप्रदर्शन
bjp rajput voters in up
उत्तर प्रदेशमध्ये भाजपा अडचणीत! तिकीट वाटपावरून राजपूत समुदाय पक्षावर नाराज
UBT leader joins shiv sena shinde group
उबाठा गटाला धक्का, माजी मंत्र्यांचा शिवसेना शिंदे गटात प्रवेश; मिलिंद नार्वेकरांवर केले गंभीर आरोप
bjp claim thane loksabha marathi news, thane lok sabha bjp marathi news
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ठाण्यावर भाजपचा दावा का? भाजपच्या विस्तारवादाने शिंदेसेना भयग्रस्त?

शिवसेना आणि सरकारमध्ये समन्वय निर्माण करून पक्षवाढीची सुरुवात ही आपल्या सातारा जिल्ह्य़ातूनच आपल्याला करावयाची आहे. सातारा जिल्ह्य़ातील तळागाळातील शिवसैनिकांना मिळालेल्या सत्तेचा वापर करून देण्यामध्ये मी कुठेही कमी पडणार नाही तरी, सर्वानी एकजुटीने शिवसेना वाढविण्यासाठी ताकदीने प्रयत्न करू या, असे आवाहन शंभूराज यांनी केले.

आमदार महेश शिंदे म्हणाले, शंभूराज देसाई यांना सर्वसामान्य जनतेविषयी कणव आहे. त्यांची आतापर्यंतची राजकीय कारकीर्द ही संघर्षांतून गेली आहे. एक हक्काचा मंत्री आपल्या सर्वाचे पक्षप्रमुख व राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आपल्या सर्वाना दिला आहे. त्यांना प्रशासनातील दांडगा अनुभव असून त्यांच्या अनुभवाचा उपयोग सातारा जिल्ह्य़ातील सर्व शिवसेनेच्या पदाधिकारी व कार्यकर्ते यांना होईल यात तिळमात्र शंका नाही. नामदार शंभूराज देसाईंनी सातारा जिल्ह्य़ामध्ये शिवसेना पक्षवाढीचा जो विडा उचचला आहे, त्याला आपण सर्वानी पाठबळ आणि ताकद देण्याची गरज आहे.

आपण सर्व जण त्यांच्या पाठीशी ठाम राहून आपल्या सर्वाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचे हात बळकट करू या, असे आवाहन शिंदे यांनी या वेळी केले. बैठकीस जिल्हाप्रमुख जयवंत शेलार, रामभाऊ  रैनाक, यशवंत घाडगे, चंद्रकांत जाधव, युवासेना प्रमुख रणजितसिंह भोसले, महिला जिल्हाप्रमुख शारदा जाधव यांच्यासह तालुकाप्रमुख, उपतालुकाप्रमुख, शहर प्रमुख व शिवसैनिक उपस्थित होते.