मंदार लोहोकरे, पंढरपूर

शहरात करोनाची साखळी तोडण्यासाठी दि ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान संचार्बाडीचे आदेश सोलापूर जिल्हाधिकारी यांनी जारी केले आहेत. त्या अनुषंगाने पहिल्या दिवशी शहरातील अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद होते.मात्र जवळपास ८५ नागरिकांनी आदेशाचे उल्लंघन केल्या प्रकरणी कारवाई केल्याची माहिती उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी दिली आहे.तर दुसरीकडे शहरत विविध प्रभागात पालिकेच्यावतीने रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यास सुरवात केली आहे.

पंढरपूर तालुक्यात शुक्रवारी ६७ रुग्ण करोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर २१ जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे तालुक्यातील आत्तापर्यंत ४१० रुग्ण करोनामुक्त झाले असून ३२० रुग्णावर उपचार सुरु आहेत. मात्र करोनाची साखळी तोडण्यासाठी विविध उपाय योजना बरोबरच संचारबंदी लागू करण्यात आली आहे. सोलापूर जिल्हाधिकारी यांनी दि ७ ते १३ ऑगस्ट दरम्यान शहरात संचारबंदी लागू केली आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळून सर्व आस्थापना बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले आहेत. संचारबंदीच्या पहिल्या दिवशी शहरात ६६ लोकाना स्थानबद्ध केले होते. तर विनाकारण दुचाकी वरून फिरणारे,तोंडाला मुखपट्टी न लावणारे असे जवळपास ८५ लोकांवर कारवाई केली आहे. संचारबंदीच्या काळात अगदी गरज असेल तरच बाहेर पडा अन्यथा पोलीस प्रशासन कारवाई करेल अशी माहिती उप विभागीय पोलीस अधिकारी डॉ सागर कवडे यांनी दिली आहे.

तर दुसरीकडे करोनाची साखळी तोडण्यासाठी शहरातील पालिका आणि आरोग्य यंत्रणा सज्ज झाली आहे. येथील गजाजन महारज मठ येथे १३ ऑगस्ट पर्यंत रॅपिड अँटीजेन टेस्ट करण्यात येणार आहे. तसेच शहरातील विविध ठिकाणी या चाचण्या करण्यात येणार आहे.तरी नागरिकांनी चाचणी करावी असे आवाहन पालिकेचे मुख्याधिकारी अनिकेत मानोरकर यांनी केले आहे.एकंदरीत पहिल्या दिवशी पंढरपूरकर वासियांनी संचार्बादिला उस्त्फुर्त प्रतिसाद दिला आहे.