News Flash

सिंधुदुर्गात दमदार पावसाचे आगमन

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बिगरमोसमी पावसाचे आगमन दमदार झाले आहे. पहिल्याच दिवशी सर्वत्रच दमदार पाऊस कोसळला, पण बुधवारी देवगडला पावसाने हुलकावणी दिली. गुरुवारी सर्वत्र पाऊस कोसळला. आजपर्यंत

| June 2, 2013 01:26 am

सिंधुदुर्ग जिल्ह्य़ात बिगरमोसमी पावसाचे आगमन दमदार झाले आहे. पहिल्याच दिवशी सर्वत्रच दमदार पाऊस कोसळला, पण बुधवारी देवगडला पावसाने हुलकावणी दिली. गुरुवारी सर्वत्र पाऊस कोसळला. आजपर्यंत जिल्ह्य़ात ४९७ मि.मी. सरासरी ६२ पाऊस कोसळला. जिल्ह्य़ात देवगड वगळता गुरुवारी सकाळी ८ वा. १२० मि.मी. पाऊस कोसळला. दिवसभर पावसाने हंगामासारखे रूप धारण केले होते. विजेच्या कडकडाटाने काही ठिकाणी वीजही गायब झाली. आजपर्यंत सर्वाधिक पाऊस वैभववाडी तालुक्यात १९१ मि.मी. एवढा नोंदला आहे. आजपर्यंत प्रत्येक तालुक्यात नोंदलेला पाऊस दोडामार्ग २० मि.मी., सावंतवाडी २१ मि.मी., कुडाळ ६२ मि.मी., वेंगुर्ले ७६ मि.मी., मालवण ४९ मि.मी., कणकवली ६५ मि.मी., देवगड १५ मि.मी., तर वैभववाडी १९१ मि.मी. मिळून सरासरी ६२ म्हणजेच ४९७ मि.मी. एवढा पाऊस जिल्ह्य़ात कोसळला असल्याचे सांगण्यात आले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 2, 2013 1:26 am

Web Title: strong rain arrive at sindhudurg
टॅग : Sindhudurg
Next Stories
1 हेमंत गोडसेंचा मनसेला रामराम
2 चोपडय़ात विवाहितेवर सामूहिक बलात्कार
3 राजकीय पक्ष, निवडणुका घटनाबाहय़
Just Now!
X