News Flash

बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकून विद्यार्थिनीचा मृत्यू

पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

(प्रतिकात्मक छायाचित्र)

दिवाळीनिमित्त कुटुंबीयांसमवेत फराळाचे साहित्य घेऊन नातेवाईकाकडे जाणाऱ्या एका १६ वर्षीय विद्यार्थिनीचा बैलगाडीच्या चाकात ओढणी अडकून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना धारणी तालुक्यात घडली.

अस्मिता छगन भिलावेकर (१६, रा. भुलोरी) असे मृत विद्यार्थिनीचे नाव आहे. ती टेंब्रुसोडा येथील शासकीय आदिवासी आश्रम शाळेत नवव्या इयत्तेत होती. अस्मिताचे आई, वडील, आजी आणि आजोबा हे तिच्या मावशीकडे मन्सूधावडी येथे बैलगाडीने निघाले होते. रस्त्यात अस्मिताच्या गळ्यातील ओढणी बैलगाडीच्या चाकात अडकल्याने तिला गळफास लागला. काही क्षणात तिचा मृत्यू झाला. अस्मिताच्या कुटुंबीयांनी गळफास सोडवण्याचा प्रयत्न केला. पण, ओढणी काढता आली नाही. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 17, 2020 12:00 am

Web Title: student dies after getting stuck in bullock cart wheel abn 97
Next Stories
1 दिलासादायक : राज्यात आज करोनाबाधितांपेक्षा करोनामुक्त झालेल्यांची संख्या अधिक
2 संघटनेतून हाकललेल्यांना पुन्हा सोबत घेणार नाही; राजू शेट्टींचा सदाभाऊंवर घणाघात
3 लुटारूंची संगत सोडली तर राजू शेट्टींना पुन्हा खांद्यावर घेईन-सदाभाऊ खोत
Just Now!
X