लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (LFU) पुणे व डॉ.प्रकाश आमटे यांच्या लोकबिरादरी प्रकल्पाच्या संयुक्त विद्यमाने गडचिरोली व मेळघाट जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय प्रवेश परीक्षेसाठी(NEET) मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. यातून विद्यार्थ्यांचा बौद्धीक, शारीरिक आणि मानसिक विकास करण्याचा मुख्य उद्देश आहे. या प्रकल्पाद्वारे गडचिरोली तसेच मेळघाट भागातील विद्यार्थ्यांना वैद्यकीय शिक्षण घेता यावे आणि भविष्यात अनेक चांगले डॉक्टर्स तयार व्हावेत या ध्येयाने प्रेरित होऊन सदर ‘ उलगुलान ‘ हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

लोक बिरादरी प्रकल्प गेली ४८ वर्षे गडचिरोलीत गुणवत्तापूर्ण शिक्षण सेवा देत आहे. शिक्षण, आरोग्य, पर्यावरण संरक्षण, पाणलोट विकास व महिला सबलीकरण ह्याद्वारे दुर्गम भागात विकास कामांचा अनुभव असलेली संस्था आहे. तसेच LFU पुणे च्या अथक परिश्रमाने मागील पाच वर्षात ५0 पेक्षा अधिक MBBS, १५पेक्षा अधिक BDS, २०पेक्षा अधिक BAMS, २०पेक्षा अधिक BHMS ला विद्यार्थ्यांनी प्रवेश मिळवले आहेत.

Even after eight months engineering students are still waiting for mark sheets
मुंबई : आठ महिन्यांनंतरही अभियांत्रिकीचे विद्यार्थी गुणपत्रिकेच्या प्रतीक्षेत
Vidya Prabodhini students from Kolhapur top in the UPSC final result
युपीएससीमध्ये कोल्हापूरचा झेंडा; विद्या प्रबोधिनीच्या विद्यार्थांची अंतिम निकालात बाजी
Admission Delayed, 500 Students of college of physican and surgeon, Maharashtra, 500 Students Still Awaiting Admission, physician students, surgeon students, admission awating physican students,
मान्यतेनंतरही सीपीएस अभ्यासक्रमाचे प्रवेश सुरू करण्यास मुहूर्त सापडेना, ५०० जागांवरील प्रवेशासाठी विद्यार्थी प्रतीक्षेत
20 people have recorded their testimony in the suicide case of nursing student in Nagpur
नागपुरात बी. एस्सी. विद्यार्थिनीच्या आत्महत्या प्रकरणात २० जणांनी नोंदवली साक्ष

खास मेळघाटातील विद्यार्थ्यांसाठी गेल्या तीन वर्षापासून लिफ्ट फॉर अपलिफ्टमेंट (LFU) पुणे यांच्यामार्फत ‘उलगुलान’ नावाने वेगळी बॅच चालवील जाते. मागील वर्षी(NEET2020) ‘उलगुलान’बॅचने मेळघाटात ऐतिहासिक निकाल लावला होता. त्यात एकूण १८ जण डॉक्टर होत आहेत (८ एम.बी.बी.एस, ४ बी.डी.एस ,४ बी.ए.एम.एस, २ बी.एच. एम. एस ). ‘उलगुलान’ च्या माध्यमातून दुर्गम भागातील आदिवासी विद्यार्थी आता शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात येत आहे. यावर्षीपासून गडचिरोली व मेळघाटातील ३० विद्यार्थ्यांची निवड करण्यात येणार आहे. दहावी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांची निवड प्रवेश परीक्षा व मुलाखत घेवून करण्यात येते. तसेच विद्यार्थ्यांची प्रशिक्षणा सोबत निवासाची व जेवणाची सुद्धा मोफत सोय करण्यात येत आहे. दोन्ही संस्थांच्या अनुभवाचा व संसाधनांचा या उपक्रमाला निश्चितच खूप फायदा होणारं आहे. NEET 2023 करीता म्हणजेच शैक्षणिक सत्र २०२१ -२०२३ या दोन वर्ष करिता नोंदणी करण्यास सुरुवात झालेली आहे. या अर्ज करण्यासाठी संकेतस्थळ:- http://t.ly/TRkL  अधिक सविस्तर माहितीसाठी ७७२००३३००७ या क्रमांकावर संपर्क साधू शकता व अधिक माहितीसाठी भेट द्या –  www.lfupune.in  असे कळवण्यात आले आहे.