News Flash

विद्यार्थी सहलीच्या बसला अपघात, तीन ठार

इंजिनिअरींग महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांची बस होती.

पुणे-बंगळुरु महामार्गावरील तासवडे टोलनाक्याजवळ कॉलेजच्या सहलीची बस आणि उसाच्या ट्रॅक्टरची जोरदार धडक होऊन भीषण अपघात झाला. या अपघातात तीन जण ठार झाले असून २२ जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
श्रीगोंदा तालुक्यातील काष्टी येथील परिक्रमा इंजिनिअरींग महाविदयालयाच्या विद्यार्थ्यांची ही बस होती. सहलीवरुन गोव्याहून परतत असताना हा भीषण अपघात झाला. जखमींवर कराड येथील कृष्णा रुग्णालयात उपचार सरु असून तीन जणांची प्रकृती गंभीर असल्याचे सांगण्यात येत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 14, 2016 1:47 pm

Web Title: students picnic school bus accident 3 dead
टॅग : Dead,School Bus
Next Stories
1 सरकारला दीड वर्षांत मस्ती !
2 विनयभंग करणाऱ्या शिक्षकाला अटक
3 जलतज्ज्ञ मुकुंद धाराशिवकर यांचे निधन
Just Now!
X