News Flash

मराठी वाचन क्षमतेत केवळ साडेचार टक्क्य़ांनी वाढ

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांना मराठीही धड वाचता येत नाही,

प्रतिनिधिक छायाचित्र

सांगली जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची दयनीय स्थिती

सांगली : जिल्ह्य़ातील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांची मराठी वाचन क्षमता वर्षभराच्या अथक प्रयत्नानंतर अवघ्या ४.४२ टक्क्यांनी वाढली असून गणित आकलन क्षमता मात्र १५.५० टक्क्यांनी वाढली आहे. ही माहिती शिक्षण समितीच्या सभेत समोर आली.

जिल्ह्य़ाच्या ग्रामीण भागात प्राथमिक शिक्षणासाठी आजही जिल्हा परिषदेच्या माध्यमातून सुरू असलेल्या प्राथमिक शाळा हाच आधार आहे. शहरी भागाच्या नजीक असलेल्या गावामध्ये आणि तालुकास्तरावर खासगी शाळांचे पेव फुटले असताना जिल्हा परिषद शाळामधील विद्यार्थ्यांची शैक्षणिक प्रगती हा चिंतनाचा विषय ठरला आहे.

जिल्हा परिषद शाळेत शिक्षण घेत असलेल्या मुलांना मराठीही धड वाचता येत नाही, आणि गणितातही मुले कच्ची असल्याचा आक्षेप घेण्यात येत होता. यावर शिक्षण विभागाने गेले वर्षभर शिक्षकांच्या मदतीने विशेष मोहीम  राबविली. या मोहिमेतून वाचन क्षमता विकसित होण्यात मर्यादा दिसत असल्या, तरी गणितामध्ये मुलांची प्रगती झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले. जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये मराठी भाषिक विकासात ६९.५३ टक्के असणारी मुले आता ७३.९५ वर आणि गणितामध्ये ५३.९५ वर असणारी विद्यार्थिसंख्या आता ६९ टक्क्यांवर पोहोचली आहे. वाचन आणि गणितात तासगाव तालुका आघाडीवर आहे.

शाळेतील विद्यार्थिसंख्या वाढविण्याच्या नादात खासगी शाळामधून कमी वयात प्रवेश देण्याचे गंभीर प्रकार समोर आल्याने सर्वच खासगी शाळांचे प्रवेश तपासणी करण्याचा निर्णय जिल्हा परिषदेने घेतला आहे. पहिल्याच्या वर्गासाठी किमान ५ वर्षे आठ महिने ही वयोमर्यादा निश्चित करण्यात आली असून त्याखालील बालकांना प्रवेश देता येणार नाही असे स्पष्ट करण्यात आले आहे.

जिल्ह्य़ाच्या विविध भागात खासगी शाळा मोठय़ा प्रमाणावर सुरू करण्यात आल्या असून या शाळेत प्रवेश देत असताना किमान वयाच्या अटीकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा तक्रारी आहेत. कमी वयाच्या मुलांनाही प्रवेश देण्यात येत असून यामुळे विद्यार्थी वाढविण्याचा प्रयत्न स्पष्टपणे दिसत आहे.

याबाबत जिल्हा परिषदेच्या शिक्षण समितीच्या बठकीत चर्चा करण्यात आली. सभापती तमणगोंडा रवि यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बठकीमध्ये विद्यार्थिसंख्या वाढीसाठी गरमार्गाचा खासगी शाळा चालकाकडून प्रयत्न होत असल्याची गंभीर बाब चच्रेत आली. या वेळी या खासगी शाळांचे प्रवेश तपासणी करण्याचा निर्णय घेण्यात आला. अशा शाळामध्ये कमी वयाच्या मुलांना प्रवेश देण्यात आल्याचे आढळल्यास त्या बालकांचे प्रवेश अपात्र ठरवून रद्द करण्यात येतील. यासाठी तालुका व जिल्हा स्तरावर तपासणीचे आदेश देण्यात आले.

जिल्हा परिषद शाळेतील दस्तऐवज महत्त्वपूर्ण असल्याने त्या कागदपत्रांचे स्कॅिनग करण्याचा निर्णय घेण्यात आला. मात्र, स्कॅिनग झाले तरी मूळ कागदपत्रे नष्ट न करता कायम ठेवण्याची सूचनाही या वेळी करण्यात आली.

जिल्हा परिषद शाळांमधील विद्यार्थीसंख्येत वाढ

वाळवा, मिरज, तासगाव आणि कवठेमहांकाळ तालुक्यातील जिल्हा परिषद शाळामध्ये विद्यार्थिसंख्या वाढत असल्याचे या वेळी सांगण्यात आले. तसेच अध्ययन स्तर टप्पा एक आणि दोनमध्ये जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये प्रगती झाली असल्याचेही आढळून आले. शाळांना ३४२ कपाटे, ३८५ पांढरे फलक पोहोच करण्यात येत असल्याचेही सभापतींनी या वेळी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 20, 2018 3:52 am

Web Title: students taking education in zilla parishad school not able to read marathi
Next Stories
1 अर्जुन खोतकरांचे रावसाहेब दानवेंना आव्हान
2 बसस्थानकामध्ये पाकिटे चोरणाऱ्या महाविद्यालयीन तरुणीला अटक
3 पोलीस ठाण्यातच पोलिसाकडून महिला पोलिसाचा विनयभंग
Just Now!
X