१७६ जणांचे अलगीकरण
विजय राऊत, लोकसत्ता
कासा : डहाणू तालुक्यातील कासा उपजिल्हा रुग्णालयातील त्या तीन वर्षे वय असलेल्या मुलीच्या संपर्कात आलेल्या दोन डॉक्टरांचे नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. बुधवारी रात्री उशिरा कासा उपजिल्हा रुग्णालय बंद करण्यात आले. सकाळी कासा गावात येण्यास मनाई करण्यात आली.
तालुक्यातील गंजाड येथील तीन वर्षे वयाच्या मुलीच्या संपर्कात आल्याने अलगीकरण करून चाचणी करण्यात आलेल्या डहाणू तालुक्यातील उपजिल्हा रुग्णालय कासा येथील दोन डॉक्टरांमध्ये करोना संक्रमण झाले आहे.
त्यांच्या संपर्कात आलेल्या कासा रुग्णालय तातडीने रात्री प्रशासनाने बंद केले. रुग्णालयातील ४४ डॉक्टर आणि कर्मचारी व रुग्ण व त्यांचे नातेवाईक असे एकूण १७६ कासा दवाखान्यातच अलगीकरण करण्यात आले आहे. त्यांच्या थुंकीचे नमुने घेण्याचे काम सुरू आहे.
रुग्णालयात उपचारासाठी ३ एप्रिलनंतर आलेल्या लोकांची माहिती घेण्याचे काम सुरू आहे. दरम्यान कासा रुग्णालयात करोना
पॉझिटिव्ह आलेले सदर दोन डॉक्टर हे शिकाऊ (इंटर्नशिप)आहेत. ४ एप्रिलपासून कासा रुग्णालयात दाखल झाले आहेत. त्यापैकी एक कांदिवली आणि नालासोपारा येथून ये-जा करत होते.
कासा रुग्णालय पूर्णपणे बंद करण्यात आले आहे. येथील डॉक्टर ,वैद्य्कीय कर्मचारी,रुग्ण व त्यांचे नातेवाईक यांचे नमुने घेण्यात येत असून त्यानंतर ३ ते १४ एप्रिल या कालावधीत उपचारासाठी दवाखान्यात उपचारासाठी आलेल्या रुग्णाची माहिती मिळविण्याचे काम सुरू आहे.
-डॉ संदीप गाडेकर, तालुका आरोग्य अधिकारी डहाणू
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on April 17, 2020 1:52 am