14 August 2020

News Flash

उपविभागीय पोलिस अधिकाऱ्याच्या वाहन चालकाची गोळी झाडून आत्महत्या

आत्महत्या करण्यामागचे कारण अद्याप अस्पष्ट, पोलिसांचा तपास सुरू

प्रतिकात्मक छायाचित्र

गडचिरोली पोलिस मुख्यालयातील उपविभागीय पोलिस अधिकाऱ्यांच्या बंगल्यावर त्यांच्या वाहनचालकाने गोळी झाडून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे.

ही घटना आज सकाळी ७ वाजेच्या सुमारास घडली. मदन गौरकर(४८) असे मृत वाहनचालकाचे नाव आहे. मदन गौरकर हे उपविभागीय पोलिस अधिकारी(अभियान) भाऊसाहेब ढोले यांचे वाहनचालक म्हणून कार्यरत होते. आज सकाळी कामावर  गेल्यानंतर त्यांनी बंगल्यावरच रायफलमधून स्वत:वर गोळी झाडली. यानंतर तात्काळ त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले. परंतु, डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले.

१९९२ मध्ये गडचिरोली पोलिस दलात भरती झालेले गौरकर हे सेमाना-न्यायालय मार्गावरील आनंदनगर वसाहतीत कुटुंबासह वास्तव्यास होते. त्यांनी कोणत्या कारणामुळे आत्महत्या केली, हे कळू शकले नाही. गडचिरोली पोलिस घटनेचा तपास करीत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 7, 2020 7:10 pm

Web Title: sub divisional police officers driver shot himself msr 87
Next Stories
1 “दोन मित्र अंधारातून चालताना धीर देतात, भूत बित काही नाही बरका”
2 ‘सारथी’चा वाद; “विद्यार्थ्यांच्या हक्काच्या पैशातून घेतल्या गेलेल्या लाखोंच्या गाड्यांची चौकशी का नको?”
3 करोना काळात नोकरीची संधी; राज्य पोलीस दलात होणार जम्बो भरती
Just Now!
X