दुष्काळाच्या पाश्र्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमधून िहगोली जिल्ह्यास पहिल्या टप्प्यात ५५ कोटी ४४ लाख मिळाले. दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना अनुदान वाटपास प्रारंभ झाला असून, १३६ गावातील २७ हजार २४९ शेतकऱ्यांना १३ कोटी ४७ लाख अनुदान वाटप झाले. ही प्रक्रिया सध्या सुरू आहे.
जिल्ह्यात कमी पाऊस पडल्याने ७०७ गावांची पीक पैसेवारी ५० टक्क्य़ांपेक्षा कमी आली. खरीप पिकांचे नुकसान झाल्याने राज्य सरकारने जाहीर केलेल्या पॅकेजमध्ये िहगोली जिल्ह्यास १ कोटी ३२ लाख ९९ हजार निधी जाहीर केला. पहिल्या टप्प्यात ५५ कोटी ४४ लाख निधी जिल्हा प्रशासनास प्राप्त झाला होता. हा निधी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना वितरण करण्यास प्रारंभ झाला आहे.
दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी प्राप्त ५५ कोटी ४४ लाख निधीतून िहगोली तालुक्यास १० कोटी ५७ लाख निधी देण्यात आला. पकी १४ गावांतील २ हजार ९१२ शेतकऱ्यांना १ कोटी ४८ लाखांचे वाटप झाले. कळमनुरी तालुक्यात १० कोटी ९१ लाख निधी देण्यात आला. पकी ५६ गावांतील १३ हजार २५८ शेतकऱ्यांना ६ कोटी ५० लाखांचे वाटप झाले. सेनगाव तालुक्यात ११ कोटी ९० लाख निधी देण्यात आला. पकी १४ गावांतील २ हजार २४६ शेतकऱ्यांना ८४ लाख निधी वाटप करण्यात आले.
वसमत तालुक्यास १२ कोटी ९९ लाख निधी देण्यात आला. यामध्ये ५१ गावांतील ८ हजार २१८ शेतकऱ्यांना ४ कोटी ६२ लाख निधी वितरीत करण्यात आला. औंढा नागनाथ तालुक्यास ८ कोटी ७९ लाख निधी देण्यात आला. पकी ७ गावातील शेतकऱ्यांना ६० लाख निधी वाटप झाला.