News Flash

२० करोना संक्रमित मातांची प्रसूती

डहाणूमध्ये समर्पित प्रसूती करोना रुग्णालयाची मागणी

डहाणूमध्ये समर्पित प्रसूती करोना रुग्णालयाची मागणी

डहाणू: करोनाच्या दुसऱ्या लाटेत डहाणू तालुक्यात समर्पित प्रसूती करोना रुग्णालय अभावी २० करोना संक्रमित मातांची प्रसूती करावी लागली आहे. करोना संक्रमित मातांना प्रसूतीसाठी नायर रुग्णालय येथे पाठवण्यात येते. मात्र ग्रामीण भागातील महिला मुंबई येथे जाण्यास तयार होत नाहीत. परिणामी डहाणू तालुक्यात समर्पित प्रसुती करोना केंद्र सुरू करण्याची मागणी होत आहे. खासदार राजेंद्र गावीत यांनी डहाणू येथे आरोग्य अधिकारी डॉ. आभिजीत चव्हाण यांच्याशी चर्चा केल्यानंतर याबाबत आपण आरोग्य संचालनालयाशी बोलून तात्काळ यावर निर्णय घेण्याच्या सूचना करणार असल्याचे सांगितले.

डहाणू तालुक्यात जानेवारी २०२१ पासून ६७७ मातांची यशस्वी प्रसूाती करण्यात आली. दरम्यान काही मातांचे करोना चाचणी अहवाल सकारात्मक येतात. अशा करोना संक्रमित महिलांना प्रसूतीसाठी नायर रुग्णालयात पाठवण्यात येते. मात्र ग्रामीण भागातील महिला मुंबईला जाण्यास तयार नसतात. लहान मुले तसेच आरोग्याची काळजी घेण्यासाठी घरातील सदस्यांना परवानगी नसल्याने ग्रामीण महिला मुंबईला प्रसूतीसाठी जाण्यास तयार होत नाहीत. परिणामी डहाणूत समर्पित प्रसूती केंद्र नसल्याने करोना संक्रमित मातांची प्रसूती वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी लागत आहे. डहाणूत एकूण २२ करोना संक्रमित मातांची प्रसूती करण्यात आली आहे. त्यामुळे आरोग्य कर्मचाऱ्यांना जोखीम पत्करून काम करावे लागत आहे. डहाणूत समर्पित प्रसूती करोना रुग्णालयाची मागणी होत आहे.

डहाणूत अतिदक्षता खाटा वाढवण्याबरोबरच करोना लसीकरणात सुसूत्रता आणण्यासाठी आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा केला आहे. डहाणूत अतिदक्षता केंद्रासाठी ४ एमबीबीएस, ४ बीएएमएस, १३ परिचारिकांचा कर्मचारीवर्ग वाढवण्याची मागणी केली आहे. मुंबईच्या तुलनेत पालघर जिल्हयातील ग्रामीण भागातील डॉक्टरांचा पगार वाढीबाबत आरोग्य मंत्री राजेश टोपे यांच्याकडे मागणी केली आहे.

राजेंद्र गावित, खासदार

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2021 2:17 am

Web Title: successful delivery of 20 pregnant women infected with covid 19 in dhanu zws 70
Next Stories
1 करोनामुळे मृत्यू झालेल्या कर्मचाऱ्यांच्या वारसांना तातडीने सेवेत घ्या
2 सातारा जिल्ह्यात रुग्णसंख्या आटोक्यात आणण्याचे आव्हान
3 मेळघाटात करोनापेक्षा लशीची भीती अधिक!
Just Now!
X