News Flash

सुटल्यावर एकाएकाचे थोबाड फोडील; परळीच्या डॉ. सुदाम मुंडेची अधिकाऱ्यांना धमकी

विविध 20 कलमानुसार गुन्हा दाखल

सुटल्यावर एकाएकाचे थोबाड फोडील; परळीच्या डॉ. सुदाम मुंडेची अधिकाऱ्यांना धमकी
संग्रहित छायाचित्र

बीड – स्त्रीभ्रूणहत्या प्रकरणात वैद्यकीय परवाना आणि पदवी प्रमाणपत्र रद्द झालेले असतानाही खासगी सराव सुरू ठेवणाऱ्या परळीच्या डॉ. सुदाम एकनाथ मुंडे याला रविवारी पोलिसांनी बेड्या ठोकल्या. शहर ठाण्यात विविध प्रकारची 20 कलमे, पोटकलमांनुसार त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला. दरम्यान कारवाईच्या वेळी डॉ. मुंडे याने ‘ सुटल्यानंतर मी तुम्हाला बघून घेईल, एकाएकाचे थोबाड फोडील’ अशी दमदाटी केल्याचे सूत्रांनी सांगितले.

बीड जिल्ह्यातील परळी येथील स्त्रीभ्रूणहत्येचे प्रकरण देशभर गाजले होते. या प्रकरणी न्यायालयाने डॉ. सुदाम मुंडेसह पत्नीला दहा वर्षाची शिक्षा सुनावलेली आहे. सर्वोच्च न्यायालयाने जामीन मंजूर केल्यानंतर बाहेर आलेल्या सुदाम मुंडेनं आपले कुकर्म सुरूच ठेवले. नंदागौळ – पूस ( ता. परळी ) रस्त्यावर नव्याने थाटण्यात आलेल्या मुंडे हॉस्पिटलमध्ये गेल्या दहा ते पंधरा दिवसापासून त्यांनी सराव सुरू केला. अखेर शनिवारी रात्री उशिरा आरोग्य विभाग आणि पोलिसांनी मुंडेच्या कुकर्माचा भांडाफोड केला.

याप्रकरणी परळी शहर ठाण्यात धर्मापुरी प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ.बालासाहेब शिवाजीराव मेढे यांच्या तक्रारीवरून जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश असतानाही विनापरवानगी रुग्ण तपासणीसाठी दाखल करुन घेतले, असा ठपका ठेवत त्याच्यावर इंडियन मेडिकल कौन्सिल कायदा 1956 चे 15 ( 2 ) , महाराष्ट्र मेडिकल पॅक्टीश्नर अॅक्ट 1961 चे कलम 33 ( 2 ) आणि भादंवी कलम 353 , 188 , 269 , 270 , 278 , 419 , 420 , 175 , 179 , 504 सह आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 कलम 51 ( ब ) , सह साथ रोग प्रतिबंध कायदा 1897 कलम 2,3,4 वैद्यकिय गर्भपात कायदा 1971 चे कलम 3 , 4 , 5 मुंबई सुश्रुषा नोंदणी कायदा -1949 कलम -3 ( 2 ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुदाम मुंडे याच्या रुग्णालयावर छापा टाकला. त्यावेळी त्यांनी हा दवाखाना आपल्या मुलीच्या नावे असल्याचे सांगितले. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्या मुलीकडे विचारणा केली असता, डॉक्टर मुलीने माझा आणि त्यांचा काहीएक संबंध नाही, असं अधिकाऱ्यांना सांगितले. शनिवारी रात्री 10 ते रविवारी पहाटे 6 वाजेपर्यंत सुरू असलेल्या कारवाईच्या वेळी सुदाम मुंडे याने अधिकाऱ्यांना ‘ मी सुटून आल्यावर तुम्हाला बघून घेईल, तुमचं थोबाड फोडीत असतो ‘ अशी धमकीही दिल्याचे सूत्रांनी सांगितले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 6, 2020 8:30 pm

Web Title: sudam munde threat to officers after took action on hospital bmh 90
Next Stories
1 चंद्रपूर जिल्ह्यात २४ तासांत २६२ नवे करोनाबाधित; पाच रुग्णांचा मृत्यू
2 दाऊदकडून ‘मातोश्री’ उडवून देण्याची धमकी; राणे बंधुनी केलं ट्विट, म्हणाले…
3 वाई : करोनामुळे आलेल्या नैराश्यातून रुग्णाची नदी पात्रात उडी मारून आत्महत्या
Just Now!
X