News Flash

‘शिवसेनेने टीका करून वातावरण गढूळ करू नये’

उद्धव ठाकरे यांनी एकला चलो रे ची भूमिका मांडत भाजपवर टीकास्त्र सोडले होते.

अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार

युतीसंदर्भात भाजपची भूमिका अनुकूल असताना शिवसेनेने यावर टीकाटिप्पणी  करून वातावरण गढूळ करू नये, असा सल्ला भाजपचे नेते व राज्याचे अर्थमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी शिवसेनाप्रमुख उद्धव ठाकरे यांना दिला.

उद्धव ठाकरे यांनी बुधवारी एकला चलो रे ची भूमिका मांडत भाजपवर टीकास्त्र सोडले होते. या संदर्भात मुनगंटीवार यांना विचारणा केल्यावर त्यांनी ही भावना व्यक्त केली. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत स्थानिक पातळीवर युती व्हावी, असा आमचा प्रयत्न असून त्या संदर्भात एक बैठकही झाली आहे. मात्र, निवडणुकीच्या पाश्र्वभूमीवर शिवसेनेकडून भाजपवर होणारी टीकाटीप्पणी अयोग्य असून ती टाळली गेली पाहिजे. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका असल्यामुळे शिवसेनेसोबत युती करण्यासंदर्भात स्थानिक पातळीवर निर्णय घेऊन त्यांनी पक्षश्रेष्ठींना सांगितले पाहिजे. या संदर्भात गेल्या आठवडय़ात बैठक झाली. पुढील आठवडय़ात पुन्हा एकदा बैठक होणार आहे. शिवसेनेने जाहीर भाषणातून भाजपवर टीका करणे टाळले पाहिजे आणि ते दोन्ही पक्षासाठी योग्य नाही. काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसने यापूर्वी एकमेकांवर याच पद्धतीने टीका केली होती, त्यामुळे शिवसेनेने या संदर्भात समन्वयाची भूमिका घेत टीकाटिप्पणी टाळली पाहिजे. शिवसेना आणि भाजपची युती व्हावी, यासाठी जिल्हास्तरावर निर्णय होत असल्यामुळे तसे प्रयत्न केले जात आहेत. मुंबईत युती व्हावी, ही भाजपची इच्छा आहे. शिवसेनेने काही अटी टाकल्या आहेत का, असे विचारल्यावर ते म्हणाले की, त्यांच्या कुठल्या अटी आहेत ते मात्र माहिती नाही.

आमदार मोहन फड शिवसेनेत दाखल

परभणी : पाथरी विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष आमदार मोहन फड यांनी गुरुवारी ‘मातोश्री’ येथे शिवसेनेत प्रवेश केला. आमदार फड यांची राजकीय कारकीर्द शिवसेनेतूनच सुरू झाली. २००५ साली त्यांनी पोखर्णी जिल्हा परिषद गटातून शिवसेनेकडून निवडणूक लढवून

जिंकली होती. परभणी जिल्हा परिषदेच्या कृषी व पशुसंवर्धन विभागाचे सभापती म्हणूनही त्यांनी त्या वेळी जबाबदारी पार पाडली. गेल्या विधानसभा निवडणुकीत फड यांनी अपक्ष म्हणून निवडणूक लढवली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 21, 2016 1:43 am

Web Title: sudhir mungantiwar comment on shiv sena
Next Stories
1 आंबोलीत राज्यस्तरीय फुलपाखरू महोत्सव
2 गतिमंद मुलांची अनोखी कलासाधना..
3 कोपर्डी अत्याचार खटला : गुन्हय़ातून वगळण्याचा आरोपीचा अर्ज फेटाळला
Just Now!
X