News Flash

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा सरकारचा आग्रह – मुनगंटीवार

न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करून पुढील दिशा ठरवण्यात येणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा राज्य सरकारचा आग्रह आहे. न्यायालयाचा निर्णय अद्याप आमच्या हाती आलेला नाही. निर्णयाची प्रत हाती आल्यानंतर त्याचा अभ्यास करून पुढील निर्णय घेण्यात येणार असल्याचे मत अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी व्यक्त केले. मुंबई उच्च न्यायालयाने गुरूवारी मराठा आरक्षण वैध असल्याचा महत्त्वपूर्ण निर्णय दिला. त्यावर प्रतिक्रिया देताना ते बोलत होते.

आतापर्यंत सरकारला जे जे सांगण्यात आले त्या सर्व गोष्टी मनापासून देण्याचा प्रयत्न आमच्या सरकारने केला. न्यायालयाने मराठा आरक्षणासाठी दिलेल्या 12 ते 13 टक्क्यांच्या मर्यादेला 16 टक्क्यांवर नेण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयाचा अभ्यास करावा लागेल. त्यानंतर पुढील दिशा ठरवली जाणार असल्याचेही मुनगंटीवार यांनी स्पष्ट केले.

मराठा आरक्षण न्यायालयात टिकले आहे. मात्र सोळा टक्के आरक्षण देता येणार नाही, नोकरी आणि शिक्षण यामध्ये 12 ते 13 टक्के मर्यादा आणली पाहिजे असे न्यायालयाने म्हटले आहे. मात्र याबाबतचा निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सरकारला दिला आहे. आरक्षणाला विरोध करणाऱ्या सगळ्या याचिका फेटाळण्यात आल्या आहेत. शैक्षणिक आणि नोकरीतलं आरक्षण वैध आहे असे मुंबई उच्च न्यायालयाने म्हटले आहे. राज्य सरकारला आरक्षण देण्याचा अधिकार आहे असेही न्यायालयाने नमूद केले

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 27, 2019 5:58 pm

Web Title: sudhir mungantiwar on maratha reservation court decision jud 87
Next Stories
1 मराठा आरक्षणाच्या निर्णयावर संभाजीराजे छत्रपती यांची प्रतिक्रिया
2 मराठा आरक्षणाच्या निकालावर फडणवीस सरकारचा प्रभाव; अॅड. सदावर्तेंचा आरोप
3 ओबीसींच्या आरक्षणाला धक्का न लावता आरक्षण-मुख्यमंत्री
Just Now!
X