29 September 2020

News Flash

मतदानापूर्वी ऊसतोडणी मजुरांना जिल्ह्य़ाबाहेर हाकलण्याचा डाव

बीड जिल्ह्य़ातून ४ लाखांपेक्षा ऊसतोडणी मजूर राज्यातील विविध साखर कारखान्याच्या क्षेत्रात तोडणीसाठी स्थलांतरित होतात. हंगाम सुरू होण्यास अवधी असतानाही त्यांना जाणीवपूर्वक जिल्ह्य़ाबाहेर हाकलण्याचा डाव आखला

| October 13, 2014 01:40 am

बीड जिल्ह्य़ातून ४ लाखांपेक्षा ऊसतोडणी मजूर राज्यातील विविध साखर कारखान्याच्या क्षेत्रात तोडणीसाठी स्थलांतरित होतात. हंगाम सुरू होण्यास अवधी असतानाही त्यांना जाणीवपूर्वक जिल्ह्य़ाबाहेर हाकलण्याचा डाव आखला जात आहे. भाजपच्या नेत्यांनी हा प्रकार घडत असल्याचा दावा केला.
 ऊसतोडणी मजुरी कराराची मुदत संपली आहे. नवीन दरवाढ व्हावी यासाठी कामगारांनी आ. पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वाखाली संप सुरू केला आहे.  गाळप हंगाम १५ ऑक्टोबरनंतर सुरू होईल, अशी  स्थिती आहे. ऊसतोडणी मजूर मतदानासाठी गावातच राहिले तर राष्ट्रवादी काँग्रेसला फटका बसेल, असे सांगितले जाते. या पाश्र्वभूमीवर साखर कारखानदार मंडळींनी या मजुरांना बाहेरगावी पाठवण्याचा प्रयत्न चालवला आहे. संपाबाबत कोणतीही तडजोड न झाल्याने मजुरांनी गाव सोडून जाऊ नये, असे आवाहन माजी आमदार केशव आंधळे यांनी केले आहे.
    राष्ट्रवादीच्या पुढाऱ्यांचे हे षड्यंत्र आहे. साखर संघाबरोबर १७ ऑक्टोबर रोजी मुंबईत बठक होणार आहे. या बठकीनंतर संपाचा निर्णय होईल. त्यामुळे मजुरांनी कोणत्याही भूलथापांना बळी न पडता गाव सोडू नये, असे आवाहन केले आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 13, 2014 1:40 am

Web Title: sugar cane worker out of beed
टॅग Beed,Election
Next Stories
1 ‘डॉक्टर’ आम्ही तुमच्याबरोबर..!
2 एनसीपीचा शब्दविस्तार ‘नॅचरल करप्ट पार्टी- मोदी
3 घोटाळेबाजांना तुरुंगात डांबू – अमित शाह
Just Now!
X