मार्च महिन्याच्या पहिल्या आठ दिवसांतच ऊस संपल्याने गाळप हंगाम थांबला असून, गतवर्षीच्या तुलनेत आधीच म्हणजे केवळ ५९ लाख २० हजार क्विंटल साखरेची निर्मिती झाली आहे. परिणामी, बाजारातील साखरेचे भावही वाढू लागले असून, २८ रुपये किलोची साखर आता ३३ ते ३४ रुपयांवर पोहोचली आहे. येत्या काळात साखरेचे भाव अजून वेगाने वाढण्याची शक्यता आहे. पाणीच उपलब्ध नसल्याने उसाची लागवडही जेमतेम असल्याने पुढच्या हंगामावरही प्रश्नचिन्ह आहे.
एरवी मे महिन्यापर्यंत चालणारा गाळप हंगाम यंदा जेमतेम सव्वाचार महिने चालला. नांदेड विभागात यंदा २५ कारखान्यांनी गाळप केले. साधारण १ नोव्हेंबर ते ७ डिसेंबर या कालावधीत सर्व कारखान्यांचे गाळप सुरू झाले होते.