ऊसदराच्या प्रश्नावरून पश्चिम महाराष्ट्रात भडकलेल्या आंदोलनामुळे सलग दुसऱया दिवशी सामान्य जनजीवन विस्कळीत झाले.
ऊसदरासाठी वाट्टेल ते…
स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या नेतृत्त्वाखाली आंदोलक शेतकऱयांनी कराडसह सांगली, कोल्हापूरमधील विविध रस्त्यांवर चक्का जाम केले आहे. यामुळे सांगली, कोल्हापूर आणि साताऱयाच्या काही भागातील अंतर्गत वाहतूक ठप्प झाली आहे. आंदोलकांनी एसटीच्या बसेसना प्रामुख्याने लक्ष्य केल्यामुळे सुरक्षेच्या कारणास्तव कराड, सांगली आगारातून सोडण्यात येणाऱया एसटी ‘बंद’ ठेवण्यात आल्या आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांच्या अडचणी आणखीनच भर पडली आहे. सांगली, कराडमधील काही बाजारपेठाही आंदोलनाच्या समर्थनार्थ ‘बंद’ ठेवण्यात आल्या आहेत.
ऊस आंदोलन चिघळले
ऊस दरवाढप्रश्नी पंतप्रधानांसोबत झालेली बोलणी निष्फळ ठरल्याने बुधवारीच या आंदोलनाने सर्वत्र उग्र रूप धारण केले होते. विशेषत: या आंदोलनाचा केंद्रबिंदू असलेल्या सांगली, सातारा, कोल्हापूर जिल्ह्यात बुधवारी तणावाची स्थिती होती. सातारा, सांगलीच्या अनेक भागात जाळपोळीच्या घटना घडल्या होत्या.