देशाच्या राजकारणात तर मराठी नेतृत्व चाचपडताना दिसते असे प्रतिपादन ज्येष्ठ विचारवंत आणि राज्यशास्त्राचे अभ्यासक प्रा. सुहास पळशीकर यांनी केले आहे. ‘गाथा महाराष्ट्राची’ या वेब व्याख्यानमालेतील ‘मराठी नेतृत्व – किती वेगळे, किती सरधोपट?’ या विषयावर प्रा. पळशीकर यांनी अभ्यासपूर्ण विवेचन केले. यावेळी त्यांनी टिळक, गोखले, रानडे, आंबेडकर यांच्यासारखे देशाला नेतृत्व देणाऱ्या महाराष्ट्रात त्यानंतरच्या कालखंडात प्रस्थापित राजकीय, सामाजिक चौकट बदलू शकणारे नेतृत्व निर्माण होऊ शकले नाही असेही सांगितले.

देशाच्या राजकारणाला वेगळी कलाटणी देणाऱ्या आणीबाणी, मंडल आयोग, हिंदुत्व आणि राजकीय स्वातंत्र्य मर्यादित करणे या प्रशद्ब्रांवर मराठी नेतृत्वाने काय भूमिका घेतली, मराठी नेत्यांनी देशाला दिशा दिली का, हिंदुत्वाला पर्याय म्हणून भारतीयत्वाची शक्ती वाढवली का, हे प्रश्न उपस्थित करून, मराठी नेतृत्वाच्या मर्यादा त्यांनी अधोरेखित केल्या.

Actor Makrand Anaspure
महाराष्ट्रातल्या राजकीय परिस्थितीवर मकरंद अनासपुरेंचं परखड भाष्य, “आम्हा मतदारांची फसवणूक…”
Baba Jumdev
विश्लेषण : विदर्भात एका ‘बाबां’बद्दल दुसऱ्या ‘बाबां’चे वादग्रस्त वक्तव्य… अनुयायांत संताप आणि भाजपला ताप!
Maharashtra
मुद्दा महाराष्ट्राचा… महाराष्ट्र समस्यांच्या विळख्यात का?
mudda maharashtracha indian center for policy and leadership development survey about Imbalance of development in vidarbha
मुद्दा महाराष्ट्राचा : विदर्भ- असमतोलाची अस्वस्थता…

गोदुताई परुळेकर, अहिल्याई रांगणेकर, मृणाल गोरे, शालिनीताई पाटील यांची महाराष्ट्राच्या राजकारणावर छाप राहिली. मेधा पाटकर यांनी जनआंदोलनातून समोर आणलेल्या मुद्यांची देशपातळीवर दखल घ्यावी लागली. या काही महिला नेत्यांचा अपवाद वगळला तर, महाराष्ट्रात नेतृत्वाची चौकट कायम पुरुष प्रधान राहिली, असे त्यांनी सांगितले.

प्रस्तुती : महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी)
सहप्रायोजक : सारस्वत को-ऑपरेटिव्ह बँक लि. आणि मे. बी. जी. चितळे डेअरी
पॉवर्ड बाय : मांडके हिर्अंरग सर्व्हिसेस, पुणे</p>