News Flash

पोलिसाचा प्रेयसीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्येचा प्रयत्न

या पोलिसाच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरु आहेत.

प्रतिनिधिक छायाचित्र

एका पोलीस कर्मचाऱ्याने प्रेयसीच्या घरी गळफास घेऊन आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचे वृत्त आहे. वाईतील एका खाजगी रुग्णालयात या पोलिसावर उपचार सुरू असून त्याची प्रकृती चिंताजनक असल्याचे समजते. या घटनेने पोलीस दलात एकच खळबळ उडाली आहे. या घटनेमागील कारण मात्र अद्याप कळू शकलेले नाही.

पाचगणी पोलीस दलात कार्यरत असलेला हा पोलीस कर्मचारी वाईतच वास्तव्यास आहे. दुपारच्या सुमारास तो आपल्या प्रेयसीच्या घरी गेला होता. यावेळी दोघांमध्ये वाद झाला त्यानंतर त्याने पंख्याला गळफास लावून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याची चर्चा आहे. आत्महत्येचा प्रयत्न केल्यानंतर त्याच्या प्रेयसीने प्रसंगावधान दाखवून गळफास घेतलेला कपडा चाकूने कापून टाकला. त्यामुळे या पोलिसाचा जीव वाचला त्यानंतर तिनेच शेजारांच्या मदतीने त्याला रिक्षातून खाजगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले, यावेळी तो अत्यावस्थ होता.

या पोलिसाच्या गळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्याच्यावर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. सध्या त्याची प्रकृती स्थिर असली तरी चिंताजनक आहे. वाई पोलीस ठाण्यातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी घटनेची माहिती मिळताच रुग्णालयात जाऊन यासंदर्भात डॉक्टरांशी चर्चा केली आणि परिस्थितीचा आढावा घेतला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 12, 2019 8:50 pm

Web Title: suicide attempt from policeman at girl friends house
Next Stories
1 तारापूर एमआयडीसीत वायुगळती; तीन कामगारांचा घटनास्थळीच मृत्यू
2 Mother’s Day 2019: ‘त्या’ दोन मुलांना ‘आई’ हाक मारायला कधीच नाही मिळणार !
3 मराठवाडा, विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्‍यता
Just Now!
X