09 April 2020

News Flash

शिक्षण घेण्यास सासरी नकार; अल्पवयीन विवाहितेची आत्महत्या

लग्नानंतर पुढे शिक्षण घेण्याची अट मृत मुलीने घातली होती.

(संग्रहित छायाचित्र)

माध्यमिक शिक्षणही पूर्ण झाले नसताना किशोरवयीन अवस्थेतच विवाह झालेल्या मुलीने सासरी शालेय शिक्षण घेण्याची इच्छा वारंवार व्यक्त केली. परंतु शिक्षण घेऊ  देण्यास नकार देत सासू आणि पतीने सतत मारहाण करून त्रास दिल्यामुळे वैतागून त्या अभागी अल्पवयीन विवाहित मुलीने गळफास लावून आत्महत्या केली. सोलापुरात लक्ष्मी पेठेतील धुम्मा वस्तीत हा प्रकार घडला.

रिंकू शंकर येरटे (वय १४) असे आत्महत्या केलेल्या दुर्दैवी अल्पवयीन विवाहित मुलीचे नाव आहे. महिन्यापूर्वी म्हणजे गेल्या २५ फेब्रुवारी रोजी हा प्रकार घडला होता. या घटनेमुळे मानसिक धक्का बसून आजारी पडलेल्या मृत मुलीच्या आईने अखेर काल बुधवारी सायंकाळी फौजदार चावडी पोलीस ठाण्यात येऊन फिर्याद नोंदविली. त्यानुसार पोलिसांनी मृत मुलीची सासू राहीबाई शिवानंद येरटे व पती शंकर शिवानंद येरटे या दोघांविरुध्द गुन्हा दाखल केला आहे.

मृत मुलगी रिंकू ही आठवीच्या वर्गात शिक्षण घेत असतानाच तिचा विवाह तीन महिन्यांपूर्वी म्हणजे १ जानेवारी २०२० रोजी शंकर येरटे या तरुणाबरोबर झाला होता. लग्नानंतर पुढे शिक्षण घेण्याची अट मृत मुलीने घातली होती. ती अट मान्य करूनच तिचे लग्न उरकण्यात आले होते. लग्नानंतर ठरल्याप्रमाणे शिक्षण घेण्यासाठी शाळेत पाठविण्याकरिता तिने सासू व पतीला आर्जव केले असता त्यास साफ नकार देण्यात आला. लग्नानंतर शाळा शिकून काय करायचे आहे ?  घरकाम कर, असे म्हणून तिचा हिरमोड करण्यात आला. याच कारणावरून सासरी तिला मारहाण होत होती. त्यामुळे निराश होऊन तिने घरात लोखंडी छताला गळफास लावून घेऊन आत्महत्या केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 27, 2020 12:49 am

Web Title: suicide of a married minors abn 97
Next Stories
1 दूध व्यवसायाला फटका
2 सोलापूरचे अर्थचक्र थंडावले
3 पशुपालकांसाठी ओळखपत्र देण्याचा महत्त्वाचा निर्णय, संचारबंदीमुळे होते अचडणीत
Just Now!
X