21 September 2020

News Flash

प्रेम प्रकरणातून तरुणाची आत्महत्या

६ ऑगस्ट रोजी योगेश हा चुलते राजेंद्र सारबंदे याच्या विहिरीजवळ बेशुद्ध स्थितीत आढळून आला

प्रतिकात्मक फोटो

राहाता : संगमनेर तालुक्यातील उंबरी बाळापूर येथील योगेश शंकर सारबंदे (वय  २५) या तरुणाने प्रेम प्रकरणातून विषारी औषध पिऊन आत्महत्या केल्याची घटना शुक्रवारी सकाळी उघडकीस आली. सायंकाळी उशिरा या तरुणाला मारहाण करून आत्महत्येस प्रवृत केल्याबद्दलचा गुन्हा आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला असून ३ जणांना अटक करण्यात आली आहे

मयत योगेश शंकर सारबंदे याला प्रेमकरणामुळे वारंवार मारहाण व दमदाटी करून आत्महत्येस प्रवृत केल्यामुळे आरोपी अनिल खेमनर, बबलु खेमनर, भगीरथ भुसाळ (रा. उंबरी बाळापूर, ता. संगमनेर) व बाळासाहेब जऱ्हाड (रा. आश्वी बुद्रुक, ता. संगमनेर) याच्या विरुद्ध गुन्हा आश्वी पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील तीन आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून एक आरोपी फरार असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे.

१० जुलै रोजी दुपारी १ वाजेच्या सुमारास अनिल खेमनर, बबलू खेमनर व भगीरथ भुसाळ यांनी अल्पवयीन मुलीच्या लग्नाची माहिती योगेश पोलिसाना देईल या भीतीने उंबरी पाटावर त्याला मारहाण केली होती.

६ ऑगस्ट रोजी योगेश हा चुलते राजेंद्र सारबंदे याच्या विहिरीजवळ बेशुद्ध स्थितीत आढळून आला. त्याच्या शेजारी विषारी औषधाची रिकामी बाटली पडलेली होती. या वेळी विक्रम बोऱ्हाडे, महेश भुसाळ यांच्या मदतीने योगेशला लोणी येथील प्रवरा ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी नेले होते. परंतु डॉक्टरांनी तपासणी करून योगेश मयत झाल्याचे सांगितले. त्यामुळे पोलिसांनी दवाखान्यात येऊन पंचनामा केला. त्यानंतर उंबरी बाळापूर येथे योगेशचा अंत्यविधी करण्यात आला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 9, 2020 5:19 am

Web Title: suicide of a young man over a love affair zws 70
Next Stories
1 बल्लारपुरात कोळसा व्यावसायिकाची गोळय़ा घालून हत्या
2 आनंदवनातील मतभेदांवर सर्वमान्य तोडगा लवकरच
3 १८ हजार कोटींच्या कर्जातून २८ लाख शेतकरी मुक्त
Just Now!
X