News Flash

सध्याची टाळेबंदी म्हणजे निव्वळ ‘फार्स’

खा. सुजय विखे यांची टीका

खा. सुजय विखे यांची टीका

नगर:सध्याची करोना प्रतिबंधक टाळेबंदी हा निव्वळ ‘फार्स’ आहे. सकाळी ७ ते ११ या वेळात या चार तासात पूर्ण चोवीस तासाची कसर भरून काढण्यासाठी झुंबड निर्माण होते आहे, त्यामुळे ‘ब्रेक द चेन’ ही राज्य सरकारची संकल्पना पूर्ण होताना दिसत नाही. त्यामुळे राज्य सरकारने ‘टास्क फोर्स’चा सल्ला घेऊन नवीन धोरणात्मक निर्णय घ्यावा, अशी मागणी भाजप खा. सुजय विखे यांनी केली.

करोनाविरुद्धची लढाई केवळ सध्यापुरती नाही, तर प्रदीर्घ काळ चालणारी आहे. त्यामुळे उशीर झाला असला तरी सध्या त्या लढाईसाठी प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभे केले जात आहेत, असे विखे म्हणाले.

विखे कुटुंबीयांनी विळद घाटातील रुग्णालयात दीड कोटी रुपये खर्चून अत्याधुनिक व स्वयंचलित प्राणवायू निर्मितीचा प्रकल्प उभारणी सुरू केली आहे. येत्या आठ दिवसात तो कार्यान्वित होईल. ६०० लिटर प्रतिमिनिट त्याची क्षमता आहे. भारतात ‘अ‍ॅटलास कॉप्को‘ या कॉम्प्रेसर निर्मिती कंपनीने हा प्रकल्प उभारण्याचे काम सुरू केले आहे.  शिर्डीतही असाच प्रकल्प उभारला जात आहे, परंतु तो जुन्या तंत्रज्ञानावर आधारित असल्यामुळे त्याच्या उभारणीला व निर्मितीला उशीर होत आहे, असे विखे यांनी सांगितले.

नगरमध्ये प्राणवायू निर्मिती प्रकल्प

करोनाविरुद्धची लढाई प्रदीर्घकाळ चालणार असल्यामुळे नगरमधील दानशूर व्यक्तींनी पुढे यावे, नगर शहरातील जिल्हा सरकारी रुग्णालयात विळद घाटाप्रमाणेच दीड कोटी रुपये खर्चाचा प्राणवायू निर्मिती प्रकल्प उभारण्याचे आपले प्रयत्न आहेत. त्यासाठी आपण नगरमधील व्यापारी, कंपन्या यांच्या संपर्कात आहोत. लवकरच त्यासाठी बैठक बोलावणार असल्याची माहिती खा. डॉ. विखे यांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 29, 2021 2:03 am

Web Title: sujay vikhe patil criticized current lockdown imposed in maharashtra zws 70
Next Stories
1 करोनामुळे पारनेर तालुका पाच दिवस बंद
2 जिल्ह्यात लशींचा खडखडाट
3 उस्मानाबाद जिल्ह्यातील सहा वकिलांचा करोनाने मृत्यू
Just Now!
X