News Flash

मंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण

करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला

महाराष्ट्र राज्य स्थापनेच्या ६० व्या वर्धापन दिनानिमित्त दुग्ध व्यवसाय विकास मंत्री तथा वर्धा जिल्ह्याचे पालकमंत्री सुनील केदार यांच्या हस्ते शासकीय ध्वजारोहण करण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या परिसरात झालेल्या या ध्वजारोहण कार्यक्रमास जिल्हाधिकारी विवेक भीमनवार, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ सचिन ओंबासे, पोलीस अधीक्षक डॉ बसवराज तेली, अपर जिल्हाधिकारी अशोक लटारे, निवासी उपजिल्हाधिकारी सुनील कोरडे व अन्य उपस्थित होते. करोनाच्या पार्श्वभूमीवर सामाजिक अंतर पाळून साधेपणाने हा कार्यक्रम साजरा करण्यात आला

करोनाबाधित जिल्ह्यातून वर्धेत आलू,कांदे,लसूण,अद्रकाची आयात होते, त्या माध्यमातून कॉरोनाचा संसर्ग पोहचू नये म्हणून लोकवस्तीच्या दूर तीन ठिकाणी अनलोडिंग पॉईंट तयार करण्यात आले आहे, या ठिकाणी इतर जिल्ह्यातून माल घेऊन येणारी वाहने थांबवून सॅनिटाईझ केल्या जातील, नंतरच हे जिन्नस शहरात येतील. या स्थळांना झेंडावंदन नंतर पालकमंत्री यांनी भेट दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2020 11:54 am

Web Title: sunil kedar flag salute hinoli nck 90
Next Stories
1 हिंगोलीत SRPF च्या ४१ जवानांना करोनाची लागण
2 राजकीय अस्थिरता निर्माण करण्याच्या प्रयत्नांना पूर्णविराम – संजय राऊत
3 सचिनने खास फोटो ट्विट करत दिल्या ‘महाराष्ट्र दिना’च्या शुभेच्छा
Just Now!
X