वाळव्यातील शेतकरी सुनील पाटील यांचा पुढाकार

उन्हाचा पारा ४० अंशावर पोहोचलेला. अन्न-पाण्यासाठी पाखरांची कुतरओढ ही नेहमीचीच. राना-वनात पाखरांसाठी ना दाण्याची सुविधा ना पाण्याची सोय. अशा वेळी या अबोल पाखरांच्या पोटापाण्याची सोय व्हावी यासाठी येथील वाळवा तालुक्यातील वशी गावच्या सुनील पाटील या शेतकऱ्याने चक्क आपले उभ्या पिकासह असलेले शेत खुले केले आहे.

Nashik District Consumer Forum,
नाशिक जिल्हा ग्राहक मंचातील दोन कर्मचारी लाच घेताना जाळ्यात, ५०० रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले
Satej Patil criticize Sanjay Mandlik says MPs do not meet even for a simple letter
साध्या पत्रासाठीही खासदार भेटत नाहीत; सतेज पाटील यांची संजय मंडलिक यांच्यावर टीका
Raju Shetty
शेतकरी, कामगारांचा आवाज संसदेत बेधडकपणे मांडण्यासाठी विजयी करा – राजू शेट्टी यांचे आवाहन
amol kolhe
आढळरावांविरोधात वीस वर्षे टोकाचा संघर्ष करणाऱ्यांचे मनोमिलन कसे होणार? खासदार डॉ. अमोल कोल्हे यांचा सवाल

उन्हाळ्यात पिण्याच्या पाण्यासाठी माणसांची तगमग चालू झाली, की शासन टँकरची व्यवस्था करते. दुष्काळ पडल्यास पोटाचीही कुणीतरी काळजी घेते. मात्र राना-वनात निसर्गाचा एक घटक असलेल्या पाखरांच्या अन्न-पाण्याची सोय कोण करणार? शहरी भागात अलीकडच्या काळात काही लोक पाखरांसाठी पाण्याची सोय करतात. मात्र रानातल्या पाखरांची कोण काळजी घेणार? त्यांच्या दाण्या-पाण्याचे काय? असा प्रश्न सुनील पाटील यांना गेले अनेक दिवस सतावत होता. यातूनच त्यांनी आपले शाळूचे उभे पीक असलेले शेतच या पाखरांसाठी दान देण्याचा निर्णय घेतला आहे. या धान्याबरोबरच शेतातच पाण्याचीही सोय केली आहे. अन्न-पाण्याची ही अशी सोय झाल्याने, तसेच या साऱ्याला सुरक्षित, आधाराचे, प्रेमळ-मायेचे वलय मिळाल्याने सध्या पाटलांच्या या शेतावर रोज पाखरांची शाळा जोमात भरू लागली आहे. पाटील यांनी आपल्या दोन एकर शेतात ऐन उन्हाळ्याच्या दिवसात पीक येईल या पध्दतीने शाळू ज्वारीची पेरणी केली. सध्या शेतातील शाळू पीक काढणीला आले आहे. मात्र काढणी करण्याऐवजी त्यांनी हे पीक पाखरांसाठी राखून ठेवले आहे. रोज पहाटे सूर्योदयाअगोदर पाखरांचे थवेच्या थवे उभ्या पिकावर तुटून पडत असतात. सकाळी नऊ-साडेनऊ वाजेपर्यंत रानात किलबिल सुरू असते. मात्र दुपारचे ऊन वाढू लागताच ही पाखरे झाडांच्या सावलीत विसावतात. या अन्नधान्याबरोबर पिण्यासाठी लागणारे पाणीही पाटील यांनी रानातच उपलब्ध करून दिले आहे. यासाठी शेतातील झाडांवर, उघडय़ा जागी प्लॅस्टिकचे कॅन, बादली, मग यांचा वापर केला आहे. हे पाणी त्यांना पिता यावे म्हणून या भांडय़ांवर आडव्या काडय़ाही बांधल्या आहेत. धान्य खाऊन तृप्त झालेले पक्षी मग इथे पाण्यावर आपली तृष्णा शांत करतात. तहान-भूक भागलेल्या या पक्ष्यांचे थवे मग या पाण्यातच खेळत राहतात.