सुनील तटकरे यांचे प्रतिपादन

राजकारणात चढ – उतार प्रत्येक पक्षात येत असतात. पक्षाचे विचार कायम राहतात. कुणाच्या बोलण्याने कुठला पक्ष संपत नाही, आणि संस्थानेही खालसाही होत नाही, असा टोला राष्ट्रवादी  काँग्रेसचे राष्ट्रीय सरचिटणीस सुनील तटकरे यांनी केंद्रीय अवजड उद्योगमंत्री अनंत गिते यांना लगावला. ते रायगड जिल्हा परिषदेच्या प्रशासकीय इमारतीवर नव्याने लावण्यात आलेल्या चित्र शिल्पांच्या अनावरण प्रसंगी बोलत होते.     यावेळी रायगड जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा आदीती तटकरे, आमदार पंडीत पटील, माजी राज्यमंत्री मीनाक्षी पाटील, रायगड जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष अ‍ॅषड. आस्वाद पाटील, जिल्हा परिषदेतील विरोधीपक्षनेते सुरेंद्र म्हात्रे, महिला व बालकल्याण सभापती उमा मंडे, समजाकल्यण सभापती नारायण डामसे, कृषी सभापती प्रमोद पाटील, शिक्षण सभापती  नरेश पाटील,  माजी अध्यक्ष अ‍ॅतड. निलीमा पाटील, माजी बांधकाम सभापती चित्रा पाटील , जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी अभय यावलकर, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अंकूश चव्हाण आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

राजकारण व्यतिरिक्त समाजकारण देखील पाहिले पाहिजे. आपण कुठे आहोत यापेक्षा आपण कुणासाठी  आहोत याचे भान ठेवून काम केले पहिजे. मुलं समर्थपणे काम करत आहेत त्यामुळे मी जिल्हा परिषदेत येत नाही. मला अलिबागला यायची गरज वाटत नाही. कुणाल तरी घाबरून मी आलिबागला येत नाही अस कुणी गरसमज करून घेऊ नये, असे म्हणत सुनील तटकरे यांनी माजी आमदार मधुकर ठाकूर याचंयावर निशाणा साधला.

जिल्हा नियोजन समिती ही घटनेत दुरूस्ती करून तयार करण्यात आली आहे. त्यात जिल्हा परिषद व नगरपरिषदांचे प्रतिनिधी निवडून येतात. त्यांना डावलून शासन नियुक्त सदस्यांना घेऊन जिल्हा नियोजन समितीचा करभार चालवीणे घटनाबा आहे, असे मत तटकरे यांनी व्यक्त केले.

या कार्यक्रमात अलिबागचे आमदार सुभाष पाटील उपस्थित होते. जिल्हा परिषद ही जिल्ह्यातील ग्रामीण भागात काम करणारी यंत्रणा आहे. जिल्हा परिषदेचे अधिकर कमी करणे हे लोकशाहीला घात आहे, शासनाने जिल्हा नियोजना मंडळाबाबत काढलेल्या नविन अध्यादेशाला विरोध केला पाहिजे असे मत व्यक्त केले, बोलता बोलता त्यांनी तटकरेंनाही कान पिचक्या दिल्या. आम्ही ज्यांना खासदार करतो ते आम्हाला नंतर विसरतात, खासदार म्हणून निवडून गेलात तर शेकापला विसरू नका असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला. एक भाऊ सोडून गेला तर घाबरू नका शेकापचे चार भाऊ तुमच्या सोबत आहेत असेही ते यावेळी म्हणाले. शेकाप आणि राष्ट्रवादीची आघाडी भक्कम आहे. आमच्यात कुठलेही वाद नाहीत. त्यामुळे सुनील तटकरे हेच पुढील खासदार असतील असा विश्वासही आमदार पाटील यांनी व्यक्त केला. कार्यक्रमाचे प्रास्ताविक चित्रा पाटील यांनी तर आभार प्रदर्शन जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष आदिती तटकरे यांनी केले.