अलिबाग : मागील लोकसभा निवडणुकीत रायगड लोकसभा मतदारसंघातून अटीतटीच्या लढतीत पराभव स्वीकारावा लागला होता. मात्र या वेळी पुन्हा एकदा विकासाच्या मुद्यावर लोकसभा निवडणूक लढविण्याची तयारी केली आहे. गेल्या वेळेस झालेल्या चुका या वेळी पुन्हा होणार नाहीत असे राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस सुनील  तटकरे यांनी स्पष्ट केले.  राज्यात काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस आघाडी सोबत  शेकापसारख्या समविचारी पक्षांची सोबत  मिळणार आहे. त्यामुळे आघाडीची ताकद वाढेल. या वेळी जनता परिवर्तन घडवेल असा विश्वास तटकरे यांनी व्यक्त केला.

‘कोकणात रासायनिक प्रकल्प नकोच’

राज्याचे उद्योग धोरण आखले गेले तेव्हापासून कोकणात रासायनिक प्रकल्प नको ही आमची भूमिका आहे. त्यावर आजही ठाम आहोत. रिफायनरी रायगड जिल्ह्य़ात येणार असल्याबाबत  कोणतीही अधिकृत घोषणा झालेली नाही. त्यामुळे त्यावर वस्तुस्थिती लक्षात घेतल्यावरच  भूमिका मांडता येईल. पण यापुढच्या काळात प्रकल्प आणायचे असतील तर ते माहिती तंत्रज्ञान, वाहन निर्मिती, सíव्हस सेक्टरशी निगडित प्रकल्प यावेत, ज्यामुळे रोजगार निर्मितीही होईल आणि प्रदूषणही होणार नाही अशी  तटकरे यांनी घेतली आहे.