26 February 2021

News Flash

प्रेषितावरील चित्रपटावर बंदी घालण्याची मागणी

मोहम्मद : मेसेंजर ऑफ गॉड’ हा ताजा चित्रपट ईश्वरनिंदा करणारा असल्यामुळे त्याच्यावर बंदी घालावी.

प्रख्यात दिग्दर्शक माजिद माजिदी यांचा ‘मोहम्मद : मेसेंजर ऑफ गॉड’ हा ताजा चित्रपट ईश्वरनिंदा करणारा असल्यामुळे त्याच्यावर बंदी घालावी, अशी मागणी मुंबईतील सुन्नी मुस्लिमांच्या ‘रझा अकादमी’ या संघटनेने केली आहे. केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात संघटनेने ‘मुस्लिमांच्या भावना दुखावणाऱ्या’ या चित्रपटाला संगीत दिल्याबद्दल ए.आर. रहमान यांच्यावरही कायदेशीर कारवाई करण्याची मागणी केली आहे. मोहम्मद पैगंबर याच्या जीवनावरील चित्रपटत्रयींपैकी पहिला असलेल्या या चित्रपटात त्यांचे बालपण आणि ते प्रेषित बनेपर्यंत त्यांची युवावस्था दाखवण्यात आली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 7, 2015 6:05 am

Web Title: sunni demand ban on prophet movie
Next Stories
1 अपयश झाकण्यासाठीच कॉंग्रेस-राष्ट्रवादी लक्ष्य
2 गोंडवाना विद्यापीठाच्या कुलगुरूपदी डॉ. कल्याणकर
3 सेट परीक्षेत माध्यम निवडीचा घोळ
Just Now!
X