03 June 2020

News Flash

घरोघरी महिलांच्या गळ्यात हळकुंड

सांगलीत सर्वत्र अंधश्रद्धेचा बाजार

संग्रहित छायाचित्र

देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र वाढून २२ मोती गळाले, यामुळे आता २२ हजार महिलांचे कुंकूही पुसले जाणार असून यापासून सौभाग्य वाचण्यासाठी गळ्यात पांढऱ्या दोऱ्यात बांधून हळकुंड बांधण्याची प्रथा महिलामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहे. या अंधश्रध्देला करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही खतपाणी मिळत आहे.

देवीच्या अंगावरील मंगळसूत्र वाढले (तुटले असे म्हटले जात नाही) असून त्यामधील २२ मणी जमिनीवर पडले आहेत. हा अपशकुन असून याचे परिणाम म्हणून करोनाच्या महामारीत २२ हजार महिलांना वैधव्य प्राप्त होण्याचे भाकीत केले जात आहे. हा गरसमज महिला वर्गामध्ये गेल्या चार दिवसापासून जोरदार फैलावला असून आपले सौभाग्य वाचविण्यासाठी उपायही सुचविण्यात आला आहे. सौभाग्य वाचविण्यासाठी पांढऱ्या दोऱ्यात बांधलेले हळकुंड गळ्यात बांधले तर यातून पती वाचू शकतो असा प्रसार महिलांच्या समाज माध्यमावरील समूहातून होत आहे. अनेक महिला धोका नको म्हणून गळ्यात हळकुंड बांधून वावरत आहेत.

करोना प्रसारामुळे होत असलेली हानी पाहून मानसिकदृष्ट्या कमकुवत झालेल्या महिला वर्गाला यामध्ये गोवण्यासाठी अशी माहितीसमाज माध्यमाद्बारे पसरविण्यात आली आहे. या अंधश्रध्देचे संदेश प्रसारित करणाऱ्यावरही करडी नजर ठेवून असे संदेश प्रसारित करणाऱ्यावर आपत्ती निवारण कायद्यानुसार कारवाईची गरज जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 9, 2020 12:09 am

Web Title: superstitious market everywhere in sangli abn 97
Next Stories
1 सोलापुरात द्राक्षबागेतील मजुराला करोनाची बाधा
2 Coronavirus: जिल्हाधिकाऱ्यांच्या इशाऱ्यानंतर मशिदींमधून २४ जण तपासणीसाठी पुढे
3 Exclusive मुलाखत : राज्यातील मंत्र्यांमध्ये समन्वयाचा अभाव – देवेंद्र फडणवीस
Just Now!
X