देवीच्या गळ्यातील मंगळसूत्र वाढून २२ मोती गळाले, यामुळे आता २२ हजार महिलांचे कुंकूही पुसले जाणार असून यापासून सौभाग्य वाचण्यासाठी गळ्यात पांढऱ्या दोऱ्यात बांधून हळकुंड बांधण्याची प्रथा महिलामध्ये प्रचंड वेगाने वाढत आहे. या अंधश्रध्देला करोना संकटाच्या पार्श्वभूमीवर शहरी भागाबरोबरच ग्रामीण भागातही खतपाणी मिळत आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

देवीच्या अंगावरील मंगळसूत्र वाढले (तुटले असे म्हटले जात नाही) असून त्यामधील २२ मणी जमिनीवर पडले आहेत. हा अपशकुन असून याचे परिणाम म्हणून करोनाच्या महामारीत २२ हजार महिलांना वैधव्य प्राप्त होण्याचे भाकीत केले जात आहे. हा गरसमज महिला वर्गामध्ये गेल्या चार दिवसापासून जोरदार फैलावला असून आपले सौभाग्य वाचविण्यासाठी उपायही सुचविण्यात आला आहे. सौभाग्य वाचविण्यासाठी पांढऱ्या दोऱ्यात बांधलेले हळकुंड गळ्यात बांधले तर यातून पती वाचू शकतो असा प्रसार महिलांच्या समाज माध्यमावरील समूहातून होत आहे. अनेक महिला धोका नको म्हणून गळ्यात हळकुंड बांधून वावरत आहेत.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Superstitious market everywhere in sangli abn
First published on: 09-04-2020 at 00:09 IST