News Flash

माजी मंत्री सुरेश जैन यांची प्रकृती खालावली

सुरेश जैन यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचे सांगण्यात येते आहे

माजी मंत्री आणि जळगाव घरकुल घोटाळ्यात आरोपी असलेले सुरेश जैन यांची प्रकृती खालावली आहे. घरकुल घोटाळ्यात दोषी ठरल्याने सुरेश जैन यांची रवानगी नाशिकच्या मध्यवर्ती तुरुंगात करण्यात आली. जैन यांची हार्ट सर्जरी याआधी झाली आहे. तसेच त्यांना इतर आजारही आहेत. आज कारागृहात त्यांना अस्वस्थ वाटू लागल्याने नाशिकच्या सिव्हील रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आलं होतं. त्यांच्यावर प्राथमिक उपचार करण्यात आले. त्यांची प्रकृती गंभीर पण स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं. तसंच गरज पडल्यास त्यांना मुंबईला शिफ्ट केलं जाईल असंही डॉक्टरांनी स्पष्ट केलं.

संमती मिळाल्यानंतर जैन यांना मुंबईत जेजे रुग्णालयात उपचारांसाठी हलवण्यात येईल अशीही माहिती डॉक्टरांनी दिली. सुरेश जैन हे जळगाव घरकुल घोटाळा प्रकरणी कारागृहात आहेत. त्यामुळे परवानगीनंतरच त्यांना मुंबईत हलवण्यात येईल असेही स्पष्ट करण्यात आले.

सप्टेंबर महिन्यात सुरेश जैन आणि इतर आरोपींना घरकुल घोटाळा प्रकरणात न्यायालयाने दोषी ठरवलं. त्यानंतर ३ सप्टेंबरला माजी मंत्री सुरेश जैन आणि गुलाबराव देवकर यांच्यासह ३८ आरोपींची रवानगी नाशिकच्या कारागृहात करण्यात आली. घरकुल घोटाळा प्रकरणातील दोषींना सुरुवातीला धुळे येथील कारागृहात ठेवण्यात आलं होतं. त्यानंतर नाशिक कारागृहात या सगळ्यांची रवानगी करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 22, 2019 8:40 pm

Web Title: suresh jain admitted in hospital of nashik scj 81
Next Stories
1 भारताची संस्कृती आणि वारसा अभ्यासकांसाठी चांगली संधी; शासनाचा मुंबईत अभ्यासक्रम
2 …म्हणून ‘या’ मतदारसंघात केवळ एकाच मतदाराने केलं मतदान !
3 हुबळी स्फोट : रेल्वेतून आलेल्या ‘त्या’ पार्सलवर शिवसेना आमदाराचं नाव
Just Now!
X