लोकसभा निवडणुकीतील निकाल आश्चर्यकारक, धक्कादायक व अंदाजाच्या पलीकडचा आहे. या पराभवाची नतिक जबाबदारी स्वीकारून आम्ही सर्व सामूहिक आत्मचिंतन करू, असे प्रतिपादन आमदार अमित देशमुख यांनी पत्रकार बैठकीत केले.
आमदार वैजनाथ िशदे, काँग्रेस जिल्हाध्यक्ष व्यंकट बेद्रे, त्र्यंबकदास झंवर, महापौर स्मिता खानापुरे, धीरज देशमुख, दत्तात्रय बनसोडे उपस्थित होते. आमदार देशमुख म्हणाले की, निकाल इतका अनपेक्षित लागेल, विक्रमी मतांनी भाजपचा उमेदवार निवडून येईल याचा अंदाज कोणालाही आला नाही. अगदी विजयी उमेदवारांनाही हा अंदाज नसावा. निवडणुकीत देशपातळीवरील मुद्दे चíचले गेल्यामुळे सहकारातून साधला गेलेला आíथक विकास यासह अनेक मुद्दय़ांचा संदर्भच राहिला नाही. पराभवाची नेमकी कारणे काय आहेत? याचा अभ्यास केला जाईल.
एलबीटी, पिण्याच्या पाण्यासह अनेक प्रश्न वेगवेगळय़ा कारणांनी प्रलंबित आहेत. आगामी विधानसभा निवडणुकीसाठी या निकालाची नोंद घ्यावी लागेल. प्रत्येक निवडणुकीचे संदर्भ वेगळे असतात. या निवडणुकीने मागचे सर्व संदर्भ गळून पडले असल्याचे देशमुख म्हणाले. पराभवातून खचून न जाता आत्मचिंतन करू व काँग्रेस पुन्हा भरारी घेईल, असा विश्वास असल्याचे ते म्हणाले. पराभूत उमेदवार दत्तात्रय बनसोडे यांना आपल्याला निवडणुकीची दिलेली संधी होती की आपला बळी दिला गेला? असा प्रश्न विचारला तेव्हा आपल्याला पक्षाने संधी दिली होती. सर्वानी एकजुटीने काम केले. लढाई हरलो म्हणजे सर्व काही संपले असा विचार न करता आम्ही पुन्हा कामाला लागू, असे उत्तर त्यांनी दिले.