24 September 2020

News Flash

रियाला शवगृहात प्रवेश दिल्याप्रकरणी मुंबई पोलिसांना क्लीन चिट

सुशांतचा मृतदेह ठेवलेल्या शवगृहात रियाला प्रवेश का देण्यात याला याबद्दल अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

अभिनेत्री रिया चक्रवर्तीला सुशांत सिंह राजपूतच्या मृत्यूनंतर शवगृहात प्रवेश दिल्याबद्दल मुंबई पोलीस व कूपर रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना राज्य मानवाधिकार आयोगाने क्लीन चिट दिलं आहे. ‘टाइम्स नाऊ’ने यासंदर्भातील वृत्त दिले आहे. सुशांतचा मृतदेह ठेवलेल्या शवगृहात रियाला प्रवेश का देण्यात याला याबद्दल रुग्णालयाविरोधी अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले होते.

राज्य मानवाधिकार आयोगाने पोलीस आणि रुग्णालयाच्या अधिकाऱ्यांना संपूर्ण स्पष्टीकरण देण्यास सांगितले होते. सविस्तर चौकशीनंतर त्यांना आतापर्यंत कोणतीही विसंगती आढळली नाही, आयोगाने नमूद केले. ‘टाइम्स नाऊ’च्या वृत्तानुसार, रियाला शवगृहात ४५ मिनिटं थांबण्याची परवानगी देण्यात आली होती. सुशांतच्या कुटुंबीयांनीही रियाच्या शवगृहातील प्रवेशाबाबत प्रश्न उपस्थित केला होता.

सोशल मीडिया व टेलिव्हिजनवर व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर मुंबई पोलीस व मुंबई महानगरपालिकेला नोटीस बजावण्यात आली होती. याप्रकरणी राज्य मानवाधिकार आयोगाकडे बऱ्याच तक्रारी गेल्या होत्या. त्यानंतर आयोगाने स्पष्टीकरण देण्यासाठी नोटीस बजावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 16, 2020 5:00 pm

Web Title: sushant singh rajput case maharashtra shrc gives clean chit to mumbai police over rhea chakraborty entry into morgue ssv 92
Next Stories
1 गुड न्यूज : ताडोबा-अंधारी व्याघ्र प्रकल्पातील पर्यटन सफारी पुन्हा सुरू
2 “मराठा आंदोलन दडपण्याचा प्रयत्न केल्यास…,” छत्रपती संभाजीराजेंचं मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र
3 “महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावा,” नवनीत राणा यांची मोदी सरकारकडे मागणी
Just Now!
X