News Flash

वाढत्या पक्षांतराने घाबरू नका – शिंदे

सत्ताधारी मंडळींकडून विरोधकांची गळचेपी करण्याचे प्रयत्न होत आहेत.

सुशीलकुमार शिंदे

राजकीय स्वार्थ, संस्थांच्या चौकशीची भीती

सोलापूर : राजकीय स्वार्थ आणि संस्थांच्या चौकशीच्या भीतीने सध्या काँग्रेस-राष्ट्रवादीतून मोठय़ा प्रमाणात पक्षांतर सुरू झाले आहे. मात्र या पक्षांतरामुळे तात्पुरता राजकीय फटका बसला तरीही पक्ष यातूनही बाहेर पडेल असा विश्वास काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे यांनी प्रसारमाध्यमांशीही  बोलताना व्यक्त केला.

शिंदे म्हणाले, की १९७७ साली काँग्रेस पक्ष पुन्हा फुटला आणि पक्षाने केंद्रातील सत्ताही गमावली होती. त्या वेळी पक्षातील अनेक दिग्गज नेते मंडळी दुसऱ्या पक्षात गेली होती. तेव्हा काही  मोजक्याच आणि फाटक्या कार्यकर्त्यांनी पक्ष सावरून धरला होता. पुढे थोडय़ाच कालावधीत १९८० साली इंदिरा गांधी अतिशय प्रतिकूल परिस्थितीत आपला करिष्मा दाखवत पुन्हा सत्तेवर विराजमान झाल्या. हा इतिहास आहे. त्यामुळे आज कोणी कितीही दुसऱ्या पक्षात जात असले, तरी ही तात्कालिक बाब आहे. सत्ताधारी मंडळींकडून विरोधकांची गळचेपी करण्याचे प्रयत्न होत आहेत. त्यामुळे दबावापोटी किंवा आमिषाला बळी पडून कोणी भाजपमध्ये प्रवेश करीत असेल, तर कोणाला सत्तेची आस असते म्हणून पक्षांतर करतो. राजकीय स्वार्थापोटी अनेकजण पक्ष सोडत आहेत. साखर कारखाने, बँकांसह अन्य संस्थांच्या चौकशीची भीती  किंवा ंअडचणींमुळेही काही लोक पक्ष सोडत आहेत. मात्र या पक्षांतरामुळे तात्पुरता राजकीय फटका पक्षाला नक्की बसेल परंतु यातूनही पक्ष बाहेर पडेल असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला.

काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्षपदासाठी आपले नाव चर्चेत आले, तरी प्रत्यक्षात त्याविषयी कोणीही आपणांस आतापर्यंत विचारले नाही, पक्षाचे काम आपण करीत असतो. परंतु राष्ट्रीय अध्यक्षाएवढी मोठी जबाबदारी आपल्यावर कोणी सोपवतील असे वाटत नाही, अशी प्रतिक्रिया शिंदे यांनी व्यक्त केली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 27, 2019 5:10 am

Web Title: sushil kumar shinde criticized congress ncp leaders for joining bjp zws 70
Next Stories
1 जायकवाडीच्या पाण्याचा हिशोबच लागेना!
2 ‘सेंट्रल किचन’च्या तपासणीचे मंत्र्यांचे आदेश
3 भाजप-शिवसेनेत कुरबुरी, तर काँग्रेसपुढे जागा राखण्याचे आव्हान
Just Now!
X