News Flash

सुशीलजी आता थोडं जपूनच; पवारांचा सल्ला..!

सोलापूरात रंगला सुशील कुमारांचा अमृतमहोत्सवी सोहळा

सुशील कुमार शिंदे (संग्रहित छायाचित्र)

वयाची पंच्चाहत्तरी गाठल्यानंतर आपल्याला जपून पावले उचलण्याची गरज असल्याचा सल्ला राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांना वाढदिवसादिवशी दिला. सोलापूरमध्ये रविवारी सुशील कुमार शिंदे यांचा अमृत महोत्सवी सोहळा साजरा करण्यात आला. सोलापुरातील पार्क स्टेडियमवर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांच्या हस्ते सुशीलकुमार शिंदे यांचा जाहीर सत्कार  करण्यात आला. या कार्यक्रमाच्या निमित्ताने पवार सोलापूरच्या व्यासपीठावर बोलत होते. सुशील कुमार यांना काँग्रेसने शक्ती दिल्याचे पवारांनी यावेळी म्हटले. मात्र, सुशील कुमार यांच्या खडतर राजकीय प्रवासाच्या आठवणी सांगताना दिल्ली ही गंमतीची नगरी असल्याचे सांगत सुशील कुमार यांच्याकडे सुरुवातीच्या काळात  पक्ष श्रेष्ठींनी  दुर्लक्ष केल्याचे सांगत पवारांनी काँग्रेस पक्षश्रेष्ठींवर अप्रत्यक्षपणे निशाणा साधला. दरम्यान, शिंदेंनी आपल्या वाढदिवासाच्या उत्साह साजरा केल्याबद्दल मनापासून आभार मानले.  ४० वर्षाच्या  राजकीय कारकिर्दीत मी एकदाही वाढदिवस साजरा केला नसल्याचे सांगत गरिबीमुळे ही सवय अंगवळणी पडली नसल्याचे ते म्हणाले.  शिंदे यांनी आभाराचे मनोगत व्यक्त करताना रात्रशाळेत शिक्षण घेतल्याचा दाखला देत तरुणाईला मिळेल ते काम करण्याचा सल्ला यावेळी दिला. आपल्या यशाच्या  प्रवासात चपराशी सहकाऱ्यांचा सिंहाचा वाटा असल्याचे सांगत सुशील कुमार यांनी जून्या सहकाऱ्यांचे देखील आभार मानले. आतापर्यंत मी वाढदिवस परिवारासोबतच साजरा करत असल्याचे सांगत या सोहळ्याच्या आयोजन केल्याबद्दल त्यांनी बिहारचे विद्यमान राज्यपाल डॉ. डी. वाय. पाटील यांचेही आभार मानले. सुशील कुमार शिंदे यांच्या अमृतमहोत्सवी समारंभासाठी सोलापुरात  राजकीय दिग्गजांनी उपस्थिती लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on September 4, 2016 4:17 pm

Web Title: sushil kumar shinde to celebrate 75th birthday in solapur
Next Stories
1 टेमघर धरण गळतीप्रकरणी १० अधिकारी निलंबित
2 ‘अॅट्रॉसिटी’ कायदा रद्द केला जाणार नाही- आठवले
3 नेवासेत अल्पवयीन मुलीवर बलात्कार
Just Now!
X