News Flash

ध्वजारोहणावेळी बडतर्फ महिला पोलिसाचा आत्मदहनाचा प्रयत्न

मागील १४ वर्ष पोलीस दलात सेवा केल्यानंतर दळवी यांच्यावर एका प्रकरणात तत्कालीन पोलीस अधिक्षकांनी बडतर्फ करण्याची कारवाई केली होती.

मागील १४ वर्ष पोलीस दलात सेवा केल्यानंतर ढोकी येथे असलेल्या महिला कॉन्स्टेबल कल्पना दळवी यांच्यावर एका प्रकरणात तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बडतर्फ करण्याची कारवाई केली होती.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे दाद मागूनही दिलासा न मिळाल्याने उस्मानाबाद जिल्ह्यातील ढोकी येथील एका महिला कॉन्स्टेबलने स्वातंत्र्यदिनाच्या दिवशी शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरू असतानाच जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारासमोर आत्मदहनाचा प्रयत्न केला. दहा दिवसांपूर्वी आपल्या दोन मुलांसह आत्मदहन करण्याचा इशारा मुख्यमंत्री फडणवीस यांना दिलेल्या निवेदनात देण्यात आला होता.

स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रांगणात पालकमंत्री अर्जुन खोतकर यांच्या हस्ते सकाळी शासकीय ध्वजारोहणाचा कार्यक्रम सुरु होता. अचानक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या प्रवेशद्वारावर गोंधळ सुरू झाला. आरडाओरड सुरू झाल्याने बघ्यांची गर्दी वाढली. अंगावर रॉकेल ओतून बडतर्फ महिला कॉन्स्टेबल कल्पना दळवी यांनी स्वतःला पेटवून देण्याचा प्रयत्न केला. प्रवेशद्वारावर तैनात असलेल्या पोलिसांनी ऐनवेळी हस्तक्षेप करीत दळवी यांना आत्मदहन करण्याच्या प्रयत्नापासून रोखले. त्यामुळे मोठा अनर्थ टळला.

मागील १४ वर्ष पोलीस दलात सेवा केल्यानंतर ढोकी येथे असलेल्या महिला कॉन्स्टेबल कल्पना दळवी यांच्यावर एका प्रकरणात तत्कालीन पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी बडतर्फ करण्याची कारवाई केली होती.

यासंदर्भात कल्पना दळवी यांनी दहा दिवसापूर्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे आपली कैफियत निवेदनाद्वारे मांडली होती. तसेच स्वातंत्र्यदिनी आपल्या दोन मुलांसह आत्मदहन करण्याचा इशाराही दिला होता. गृहविभागाकडून कोणत्याही प्रकारचा सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्याने शासकीय ध्वजारोहण सुरू असतानाच दळवी यांनी अंगावर रॉकेल ओतून घेत आपली जीवनयात्रा संपविण्याचा प्रयत्न केला. पोलिसांनी त्यांना ताब्यात घेतले असून उशिरापर्यंत गुन्हा नोंदविण्याची प्रक्रिया सुरू होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 15, 2018 3:59 pm

Web Title: suspended ladies police constable attempt to commit suicide in osmanabad during flag ceremony
Next Stories
1 दीड वर्षांपासून सुटी न मिळाल्याने ट्रॅकमनची रेल्वेखाली आत्महत्या, संतप्त कर्मचाऱ्यांचा रेल रोको
2 पैशांच्या कारणावरून जामखेडमध्ये एसटी वाहकावर गोळीबार
3 ध्वजारोहणावेळी सोलापुरात युवकाचा आत्मदहनाचा प्रयत्न
Just Now!
X