सीमेवर लढणाऱ्या जवानांच्या पत्नींबाबत आक्षेपार्ह आणि संतापजनक वक्तव्य करणारे विधानपरिषदेतील भाजपाचे सहयोगी आमदार प्रशांत परिचारक यांचे बुधवारी निलंबन मागे घेण्यात आले आहे.
स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा परिषद निवडणुकांच्या प्रचारादरम्यान, सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूरमधील भोसे येथे उमेदवाराच्या प्रचारसभेत, विरोधकांवर टीका करताना सीमेवर लढणाऱ्या जवानांबाबत परिचारक यांनी अपमानास्पद वक्तव्य केले होते.
‘पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सीमेवर लढत असतो आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला, त्या आनंदात तो पेढे वाटतो. राजकारणही तसंच आहे,’ असे वादग्रस्त वक्तव्य परिचारक यांनी केले होते. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर त्यांना टीकेला समोरे जावे लागले होते. त्यामुळे त्यांना विधान परिषदेतून निलंबित करण्यात आले होते.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on February 28, 2019 2:34 pm