News Flash

माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या सुनेचा संशयास्पद मृत्यू!

जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी दिला दुजोरा

माजी खासदार यशवंतराव गडाख यांच्या स्नुषा गौरी प्रशांत गडाख यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. नगर शहरातील उच्चभ्रू व राजकीय नेत्यांची वसाहत असलेल्या यशवंत कॉलनीमध्ये गौरी यांचा संशयास्पद मृत्यू झाल्याने सर्वत्र चर्चा सुरु आहे.

गौरी प्रशांत गडाख (वय ३२) यांचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे. यासंदर्भात साईदीप रुग्णालयाने तोफखाना पोलीस ठाण्यास माहिती कळवली आहे. पोलीस अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली असून अधिक तपास सुरू आहे. आज, शनिवारी रात्री उशीरा ही घटना घडली.

गौरी प्रशांत गडाख यांनी गळफास घेतल्याची माहिती मिळत आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक मनोज पाटील यांनी गौरी प्रशांत गडाख मृतावस्थेत आढळल्याच्या घटनेला दुजोरा दिला आहे. रात्री उशिरापर्यंत विच्छेदन प्रक्रिया सुरू होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 7, 2020 10:20 pm

Web Title: suspicious death of daughter in law of former mp yashwantrao gadakh aau 85
Next Stories
1 महाराष्ट्रातील धार्मिक स्थळं दिवाळीनंतर सुरु करणार, मुख्यमंत्र्यांनी दिले संकेत
2 योग्य खबरादारी घेऊन दिवाळीनंतर शाळा सुरु कराव्यात-उद्धव ठाकरे
3 अर्णब गोस्वामी यांच्या विरोधातील केस बंद करणाऱ्या पोलिसांविरोधात हायकोर्टात याचिका
Just Now!
X