News Flash

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांकडून सेंट्रल बँकेच्या फलकाची तोडफोड

पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

‘स्वाभिमानी’च्या कार्यकर्त्यांकडून सेंट्रल बँकेच्या फलकाची तोडफोड
बॅँकेच्या इमारतीला काळे फासताना स्वाभिमानीचे कार्यकर्ते.

अकोला : मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँकेच्या शाखाधिकाऱ्याने पीक कर्ज मंजूर करण्यासाठी शेतकऱ्याच्या पत्नीकडे शरीरसुखाची मागणी केल्याने संतप्त झालेल्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी शनिवारी दुपारी बँकेच्या फलकाची तोडफोड करून बँकेच्या इमारतीला काळे फासले. यावेळी कार्यकर्त्यांनी बँकेच्या इमारतीवर चढून प्रचंड घोषणाबाजी करीत शाखाधिकारी राजेश हिवसे याला अटक करण्याची मागणी केली. दरम्यान, पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करून आंदोलनकर्त्यांना ताब्यात घेतले.

बुलढाणा जिल्हय़ाच्या मलकापूर तालुक्यातील दाताळा येथील सेंट्रल बँकेत एक शेतकरी दाम्पत्य पीक कर्ज घेण्यासाठी गेले होते. शाखाधिकारी राजेश हिवसे याने कागदपत्राची पाहणी करून या शेतकऱ्याचा मोबाईल नंबर मागितला. शेतकऱ्याने आपल्या पत्नीचा क्रमांक दिला. मोबाईलवर शाखाधिकारी हिवसे याने संपर्क साधून त्या शेतकरी महिलेला कर्ज मंजुरीच्या बदल्यात शरीरसुखाची मागणी केली. या प्रकारणाचे तीव्र पडताद बुलढाणा जिल्हय़ात उमटले. या प्रकरणाचा निषेध करण्यासाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ अध्यक्ष  देवेंद्र भुयार, विद्यार्थी संघटनेचे पश्चिम विदर्भ प्रमुख चंद्रशेखर चंदन, सोशल मीडियाचे अध्यक्ष प्रदीप शेळके, स्वाभिमानी पक्षाचे जिल्हाध्यक्ष अमोल राऊत, सय्य्द वशीम, रशीद पटेल, विजय बोराडे, विवेक पाटील, शशिकांत पाटील, नीलेश पुरभे, रमेश जोशी, सतीश नवले या कार्यकर्त्यांनी शनिवारी दाताळा येथील सेंट्रल बँक गाठली. मात्र, शनिवारची सुटी असल्याने बॅँक बंद होती. कार्यकर्त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करीत बँकेच्या इमारतीवर चढून बँकेचा फलक तोडला व बँकेच्या इमारतीला चारही बाजूंनी काळे फासले.

 

बँकेचा कारभार चालू देणार नाही

पीक कर्ज मागण्यासाठी गेलेल्या शेतकऱ्याच्या पत्नीकडे बँक अधिकाऱ्याने शरीरसुखाची मागणी करण्याचा प्रकार अत्यंत घृणास्पद व निंदनीय आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटना शेतकरी महिलांचा अपमान कदापिही खपवून घेणार नाही. दाताळा येथील सेंट्रल बँकेचा मुजोर अधिकारी राजेश हिवसे याला तातडीने अटक करून नोकरीतून बडतर्फ करा. अन्यथा बॅँकेचा कारभार चालू देणार नाही, असा इशारा स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष रविकांत तुपकर यांनी दिला आहे.

 

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 24, 2018 2:15 am

Web Title: swabhiman party workers break central bank board
Next Stories
1 आठवीनंतर राज्यात ‘शिक्षणाची पानगळ’
2 सौरपंप वापरात ओडिशाची आघाडी; महाराष्ट्रात अजूनही अभ्यासच सुरू
3 माढावर ‘स्वाभिमानी’चाच हक्क  – राजू शेट्टी
Just Now!
X